शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

मसरामटोला केंद्रांतर्गत पुतळी, नरेटीटोला, प्रधानटोला, कोहळीटोला, कोयलारी, शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, मोहघाटा व पांढरवाणी ही गावे येतात. धानाची मळणी होऊन पंधरवाडा लोटला तरीही खरेदी केंद्र सुरुच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात विकावे लागते. परिणामी बोनसची रक्कम मिळून प्रती क्विंटल आठशे रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना विसरले का?

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव-सडक येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेतंर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. शेतकरी धानाची मळणी करुन धान विक्रीसाठी खरेदी केंद्राची वाट पाहत आहेत. अशातच काही शेतकरी व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात धान विक्री करीत आहेत. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांवर भाषण देणारे आता शेतकऱ्यांनाच विसरले का? असा सवालही शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.मसरामटोला केंद्रांतर्गत पुतळी, नरेटीटोला, प्रधानटोला, कोहळीटोला, कोयलारी, शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, मोहघाटा व पांढरवाणी ही गावे येतात. धानाची मळणी होऊन पंधरवाडा लोटला तरीही खरेदी केंद्र सुरुच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान व्यापाऱ्यांना अत्यल्प दरात विकावे लागते. परिणामी बोनसची रक्कम मिळून प्रती क्विंटल आठशे रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.यावर्षी परतीच्या पावसाचा फटका धान पिकाला बसला.त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होत असल्याची ओरड आहे. एकीकडे उत्पादनाचा फटका तर दुसरीकडे दर मिळत नसल्याने दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. तर या परिसरात अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू होण्याच्या हालचाली दिसत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मसरामटोला धान खरेदी केंद्राला अधिकाऱ्यांकडून मंजुरीच मिळाली नसल्याचे बोलले जाते.निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या समस्येवर मोठे फोकस केले होते. ते शेतकऱ्यांनाच विसरले का? असा सवालही करीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्वरित मसरामटोला धान खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड