शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून धानाच्या दरवाढ आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने धानाला प्रती क्विंटल १८१५ हमीभाव जाहीर केला आहे.तर पाचशे रुपये प्रती क्विंटल बोनसही जाहीर केला.

ठळक मुद्देहिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा : हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागून

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या दरात प्रती क्विंटल दोनशे रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत असला तरी या संबंधिचे आदेश अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे यावरुन संभ्रम कायम असून शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने धानाला प्रती क्विंटल १८१५ हमीभाव जाहीर केला आहे.तर पाचशे रुपये प्रती क्विंटल बोनसही जाहीर केला. त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान धानाच्या प्रती क्विंटल दरात २०० रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २५०० रुपये दर मिळणार आहे. हमीभाव आणि बोनसमुळे यंदा फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत २९ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे. परिणामी धान खरेदी केंद्रावर धानाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून गोदाम सुध्दा हाऊसफुल झाल्याने प्रथमच ४ लाख क्विंटल धान उघड्यावर ठेवण्याची वेळ फेडरेशनवर आली आहे. यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढण्याचे कारण मिळत असलेला हमीभाव आणि बोनस असल्याचे फेडरेशनच्या अधिकाºयांनी सांगितले. शासनाने धानाला पाचशे रुपये बोनस देण्याबाबतचे आदेश या दोन्ही विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र प्रती क्विंटल धानाच्या दरात दोनशे रुपये वाढ करण्यात आल्या बाबतचे आदेश शासनाकडून अद्यापही प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे.घोषणेला दोन महिन्याचा कालावधी लोटून यासंबंधिचे आदेश न निघण्याचे कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.यंदा धान खरेदीचा विक्रमजिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने मागील दहा बारा वर्षांचे धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे.या दोन्ही विभागाने खरीप हंगामात यंदा प्रथमच १६ फेब्रुवारीपर्यंत २९ लाख क्विंटल धानाची खरेदी केली आहे. तर धान खरेदी ३१ मार्चपर्यंत चालणार असून यंदा जिल्ह्यात धान खरेदीचा नवा विक्रम नोंदविला जाण्याची शक्यता आहे.बाजार समित्या पडल्या ओसशासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा धानाला हमीभाव, बोनस पकडून २५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकºयांचा कल धान खरेदी केंद्रावर अधिक असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे एकही शेतकरी भटकत नसल्याने त्या ओस पडल्या असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

टॅग्स :agricultureशेतीMarket Yardमार्केट यार्ड