शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ओळखपत्रे कचऱ्यात

By admin | Updated: January 5, 2015 23:05 IST

जिवंत अर्भकाला फेकण्याच्या प्रकाराने गोंदियात खळबळ उडाली असताना सोमवारी गोंदियात मतदार ओळखपत्रे चक्क कचऱ्यात फेकण्याचा प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडले आहे.

गोंदिया : जिवंत अर्भकाला फेकण्याच्या प्रकाराने गोंदियात खळबळ उडाली असताना सोमवारी गोंदियात मतदार ओळखपत्रे चक्क कचऱ्यात फेकण्याचा प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडले आहे. गोंदिया तहसील कार्यालयाचा हा प्रताप असल्याचे उघड झाले आहे.शहरातील संजय नगर परिसरातील एका प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र व मतदार याद्या बेवारस मिळून आल्या आहेत. सोमवारी (दि.५) सकाळी ८ वाजतादरम्यान उघडकीस आलेल्या या प्रकाराने शासकीय यंत्रणेचे मात्र टेंशन वाढविले आहे. येथील तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करावयाचे असल्याने मागील दोन महिन्यांपासून जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू आहे. या जुन्या इमारतीचा मलबा मागील १५ दिवसांपासून संजय नगर परिसरातील कव्वाली मैदानजवळील राकेश टेंभरे यांच्या प्लॉटमध्ये टाकला जात आहे. या प्लॉटलाच लागूनन सार्वजनिक शौचालय आहे. सोमवारी (दि.५) सकाळी परिसरातील काही नागरिक शौचालयाला गेले असता त्यांना मलब्यात मतदार कार्ड व मतदार याद्या दिसून आल्या. कचऱ्यात मतदार ओळखपत्र गेलेच कसे या प्रश्नाने अचंबित झालेल्या नागरिकांनी ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरविली.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार व परिसराचे पटवारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता सुमारे पाच हजार मतदार कार्ड, मतदार याद्या व हलफनामे मलब्यात आढळले. अधिकाऱ्यांनी ते सर्व कागदपत्र ताब्यात घेतले. (शहर प्रतिनिधी)तहसील कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्हविशेष म्हणजे, नुकत्याच घेण्यात आलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांत कित्येकांना मतदार ओळखपत्र मिळाले नसल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले. दुसरीकडे हजारोंच्या संख्येत मलब्यात हे कार्ड सापडल्याने नागरिकांत एकच रोष दिसून येत आहे. शिवाय मतदारांच्या जागृतीसाठी व मतदानासाठी शासनाकडून जाहीरातींवर लाखो रूपये खर्च केले जातात. दुसरीकडे येथील तहसील कार्यालय प्रशासनाकडून असा बेजबाबदार कारभार केला जात असल्याने शासकीय यंत्रणा किती ईमानेइतबारे काम करीत आहे याची प्रचिती येते. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.