शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे

By admin | Updated: March 25, 2017 01:36 IST

प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेवून व्यक्तिगत जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात सुद्धा स्वच्छता राखावी.

उषा मेंढे : ग्राम स्वच्छता समितीकडून गांधीटोला गावाची पाहणी ेसाखरीटोला : प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेवून व्यक्तिगत जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात सुद्धा स्वच्छता राखावी. स्वच्छतेचे विविध फायदे असून गावागावांत स्वच्छता मोहीम राबविली जावी. यासाठी शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले असून स्वच्छता ही एका दिवसासाठी नाही तर निरंतर असावी म्हणून निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हापरिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. गांधीटोला येथे मंगळवारी (दि.२१) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हास्तरीय चमूने भेट देत पाहणी केली असता त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. सदस्य लता दोनोडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे, पत्रकार शर्मा, समाजकल्याण अधिकारी रामटेके, खंड विकास अधिकारी खांडे, सरपंच रेखा फुंडे, माजी पं.स. सभापती तुकाराम बोहरे, सातगावच्या सरपंच संगिता कुसराम, डॉ. सुषमा देशमुख, जेठभावडा ग्रामपंचायतचे सरपंच रहांगडाले, उपसरपंच भूमेश्वर मेंढे उपस्थित होते. गावात तपासणी चमू दाखल होताच फटाके फोडून तसेच पुष्पांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपसरपंच भूमेश्वर मेंढे यांनी प्रास्ताविकातून गांधीटोला गाव विकासाच्या दिशेने करीत असलेल्या वाटचालींचा आढावा मांडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी, स्वच्छतेचे महत्व पटवून देताना उघड्यावर शौचास जाणे ही निंदनीय बाब आहे. यामुळे अनेक आजार जडतात. केवळ चमू येणार आहे म्हणून स्वच्छता न ठेवता गावकऱ्यांनी वर्षभर स्वच्छता राखावी. ही स्वच्छता आपल्यासाठीच आहे. आजारी पणाचे प्रमाण कमी होते. गोंदिया जिल्ह्याने शौचालय बांधकामाचे लक्ष्य पूर्ण केले असून फक्त घोषणा व्हायची आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे मत मांडले. यावेळी तपासणी चमूने संपूर्ण गाव फिरुन स्वच्छतेची पाहणी केली. संचालन ग्रामसेवक एस.एस. रहांगडाले यांनी केले. आभार शिक्षक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)