रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:18+5:30

खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली.

The victim had to work for sowing rabi | रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

रबी पेरणीसाठी बळीराजा लागला कामाला

Next
ठळक मुद्देशेतमजुरांची मजुरी वाढली : परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परतीच्या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले, अन् शेतकऱ्यांचे खरीप पीक पाण्यात वाहून गेले. हजारोंचा पेरणी, निगराणीचा खर्चही निघत नसल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महागाईमुळे शेतकºयांना मोठे कष्ट करावे लागत आहे. मात्र हे दुख: विसरुन बळीराजा रब्बीच्या पेरणीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामात धानाचे क्षेत्र सर्वाधिक होते. उशिरा का होईना, परंतु पावसाने दमदार हजेरी लावून पिके वाढविली. खर्चाचा विचार न करता भविष्यातील उत्पादनाची अपेक्षा ठेऊन शेतकºयांनी शेतात डोलणारा पिकांची जिवापाड निगराणी केली. शेतकरी आनंदीत होऊन आर्थिक लाभाचे स्वप्न रंगवत होता. परंतु सुगीचे दिवस येताच वरुण राजाची वक्रदृष्टी फिरली. परतीच्या पावसाने झोडपले. यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यावर तरंगत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्याभरात निर्माण झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले धानपीक सडून गेले. परतीच्या पावसाने धान मातीमोल झाल्याने पेरणीसाठी झालेला खर्च कसा निघणार याची चिंता शेतकºयांना लागली आहे.
धानाचे बहरलेले शेत पावसानंतर उत्पादनहीन झाल्याचे पाहून जिल्ह्यातील शेतकरी हतबल होऊन उरले सुरले धान शेताबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.उत्पादन वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडली.यात ही महागाईने तोंड वर काढले. याशिवाय शेती कामातील रोजगारांचा भाव गगनाला भिडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन शेती कामाकरिता पुरुषांसाठी ३०० तर महिला रोजगाराकरिता १५० रुपये इतका खर्च लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आणखी बिघडत असल्याची वास्तविकता निर्माण झाली. पुढील पिके घेण्याची तयारी करण्यासाठी शेतकºयास आता पेरणीच्या दुप्पट खर्च लागत असल्याने नवीन पेरणी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहे.

तणनाशकांच्या किमतीत वाढ
पावसामुळे शेतात विविध प्रकारचे तण (गवत) वाढले. त्यामुळे शेती मशागत करण्यात अडथळा निर्माण होत आहे. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने तणनाशक औषधाद्वारे नष्ट करण्यावर शेतकºयांनी भर दिला. परंतु जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करुन भाववाढ केली. २८० रुपयांना मिळणारा तणनाशकाचा डबा आता ३५० रुपयांपेक्षा अधिक किमतीने खरेदी करावा लागत आहे.

Web Title: The victim had to work for sowing rabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती