शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाच्या आठव्या दिवशी वाहनचालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

मागील आठ दिवासांपासून सुरू असलेल्या संपामुळे सर्वच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अश्कोम मीडिया प्रा.लि.कंपनी अंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जात आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून कंत्राटी तत्वावर ७८ रुग्णवाहिका चालकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे

ठळक मुद्देकंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे उपोषण सुरूच : मानधनात वाढीसह इतर मागण्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अश्कोम मीडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनी (भोपाल) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य विभागात ७८ रुग्णवाहिका चालक कंत्राटी तत्त्वावर मागील वर्षभरापासून कार्यरत आहेत. कंपनीकडून त्यांना २४ तास अल्पशा मानधनावर राबवून घेतले जात आहे. सोयी सुविधा दिल्या जात नसल्यामुळे या ७८ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन व बेमुदत उपोषणाला १८ नोव्हेंबरपासून सुरूवात केली आहे. परंतु उपोषणाच्या आठव्या दिवशी सोमवारी (दि.२५) मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक प्रेमभाऊ पिकलमुंडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.मागील आठ दिवासांपासून सुरू असलेल्या संपामुळे सर्वच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अश्कोम मीडिया प्रा.लि.कंपनी अंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जात आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून कंत्राटी तत्वावर ७८ रुग्णवाहिका चालकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे. या रुग्णवाहिका चालकांना अल्पशा मानधनावर २४ तास राबवून घेतले जात आहे. मानधनात वाढ करण्याच्या मागणीसह अन्य सोयी सुविधा लागू करण्यात याव्या यासाठी रुग्णवाहिका चालकांनी अनेकदा कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्व ७८ रुग्णवाहिका चालकांनी १८ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन व जि.प.समोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.परिणामी ७८ रुग्णवाहिकांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. केंद्र शासनाने २४ जुलै २०१९ पासून लागू केलेल्या नियमानुसार कामगारांच्या बेसीकमध्ये वाढ करुन तीन जुलै २०१९ पासून लागू करण्यात यावी, साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा देण्यात यावी, कामाचे ८ तास निश्चित करुन सुटीची वेळ निर्धारीत करावी, ८ तासांपेक्षा अधिक काम केल्यास त्याचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, शासनाने लागू केलेल्या सोयी सुविधा देण्यात याव्या, आॅक्टोबर २०१८ पासूनची ईएसआयसी रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन उपोषण सुरू करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.या संपात सहभागी होण्यासाठी मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक प्रेमभाऊ पिकलमुंडे हे येत असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आल्यामुळे त्यांचा रस्त्याच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Socialसामाजिक