तिरोडा कृउबासमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात

By Admin | Updated: October 17, 2015 02:35 IST2015-10-17T02:35:09+5:302015-10-17T02:35:09+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाला स्वत:हून सुरुवात करण्यात आली.

In Tiroda Krusbas the Sanitation campaign started | तिरोडा कृउबासमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात

तिरोडा कृउबासमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाला स्वत:हून सुरुवात करण्यात आली. अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी समितीचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस यांच्यासमवेत सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेत आपण स्वच्छेने सहभागी व्हावे असे आवाहन केले. सर्वांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली. गुरुवारी संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले. परिसरातील किरायेदार यांनी सुद्धा स्वत:च्या दुकानात कचरापेटीची व्यवस्था करावी, असेही आदेश देण्यात आले. यानंतरही कुणी दुकानदाराने कचरापेटी न ठेवता कचरा परिसरात केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी समितीचे सचिव आर.सी. बैस, लेखपाल के.एस. बिसेन, निरीक्षक सी.एन. चव्हाण, लिपिक के.के. शुक्ला, आर.एम. मडावी, ए.जी. रहांगडाले, टी.एफ. ठाकरे, पी.आर. खोब्रागडे, ए.आर. नंदेश्वर, के.पी. कटरे, आर.एम. उके, ए.बी. पटले, सी.के. पटले, पी.बीे. बघेले उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: In Tiroda Krusbas the Sanitation campaign started