शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

तिघांची आत्महत्या तर दोघांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: September 20, 2014 23:52 IST

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुण महिलेसह वृद्धेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. यासोबतच दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एकाचा तलावात बुडाल्याने तर दुसऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.

गोंदिया : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुण महिलेसह वृद्धेने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. यासोबतच दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात एकाचा तलावात बुडाल्याने तर दुसऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दोन वर्षापासून असलेल्या दम्याच्या आजाराला कंटाळून शुक्रवारी चुलबंद नदीच्या बोंडगाव परिसरातील पात्रात उडी घेऊन पारबता पांडुरंग बोदेले (८१) रा.बोंडगाव या वृद्ध महिलेने आत्महत्या केली. गणपत पांडुरंग बोदेले यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अदासी येथील झिनीदालसिंग पाडुंसिंग सोमवंशी (५५) या इसमाने खोकला व कानाच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारच्या सायंकाळी ५.३० वाजता विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विनोदसिंग सोमवंशी (२८) रा.अदासी यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रतापगड येथील मोनिका भास्कर कचलाम (२७) या महिलेने विष प्राशन केल्यामुळे तिला उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी येथील ख्रिश्तानंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. डॉ.साईनाथ भोवते यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी सदर घटनेसनदर्भात आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मालीजुंगा येथील तलावाच्या पाण्यात ४० वर्षाच्या इसमाचा मृतदेह आढळला. जनीराम शामराव मेश्राम (४०) रा. मालीजुंगा असे मृताचे नाव आहे. गुरूवारच्या सायंकाळी ५.३० वाजता तो घराबाहेर पडला. शुक्रवारच्या सायंकाळी ४.३० वाजता त्याचा मृतदेह आढळला. सुखदेव गणाजी कापगते (५२) रा. मालीजुंगा यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. पाचव्या घटनेत देवरी येथील कार्तिक मधुकर मेश्राम (२३) या तरूणाला रविवारी सर्पदंश झाल्याने त्याला उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)