शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पांढरवानी धान खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाचा काटा होत नसल्याने शेतकरी अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत असून हाच धान नंतर व्यापारी धान खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमाल धानाचा वजन काटा करण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांची मजुरी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाचा वजनकाटा करून धान खरेदीचे काम त्यांनी बंद केले आहे.

ठळक मुद्देहमाल मजुरीपासून वंचित : प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय नवेगावबांधच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पांढरवाणी मालगुजारी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर हमालांची मजुरी न मिळाल्यामुळे केंद्रावर वजन काटा करण्यास त्यांनी नकार दिल्याने हजारो क्विंटल धान खरेदी केंद्रावर पडून आहे.सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. पांढरवाणी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान विक्रीस आणला आहे. मात्र केंद्रावरील हमालांना मजुरी न मिळाल्याने धानाचा काटा करणे बंद केले आहे.परिणामी मागील चार पाच दिवसांपासून काटे बंद असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे काही खासगी व्यापारी शेतकऱ्यांचे सातबारा मिळवून त्यांच्यावर धानाची विक्री करीत असल्याची ओरड आहे. तर काही केंद्रावर आधी व्यापाऱ्यांचा धानाचा काटा केला जात असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड सुरू आहे.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाचा काटा होत नसल्याने शेतकरी अल्प दरात खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत असून हाच धान नंतर व्यापारी धान खरेदी केंद्रावर विक्री करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमाल धानाचा वजन काटा करण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांची मजुरी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाचा वजनकाटा करून धान खरेदीचे काम त्यांनी बंद केले आहे. परिणामी धान खरेदी ठप्प आहे. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धानाचे काटे होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू असताना अद्यापही संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे.उपप्रादेशिक विभाग व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नवेगावबांध यांनी याप्रकरणी लक्ष देऊन अडचण दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.आधारभूत केंद्रावर धान खरेदी करतेवेळी वजन काटा करणाऱ्या हमालांची मजुरी दिली नाही. त्यामुळे काही दिवस धान खरेदी बंद होती परंतु त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा बोलाविण्यात आले आहे.बुधवारपासून धान खरेदी सुरू झाली आहे.- चंदू चुटे, केंद्रप्रमुख आधारभूत धान खरेदी केंद्र पांढरवाणी.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड