शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

जुलै महिना उजाडला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे टाकलेल्या पऱ्ह्यांना थोडी संजीवनी मिळत आहे; पण पावसाच्या अनियमिततने बळिराजाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे साकडे घालत असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देपावसाने गाठली सरासरी : मात्र, अनियमित पावसाने बळीराजाच्या काळजीत भर, पाच टक्केच रोवण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच मान्सूनदेखील महाराष्ट्रात वेळेत दाखल हाेईल असे संकेत दिले होते. मात्र, यंदा सुरुवातीपासून अंदाज चुकत आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे टाकलेल्या पऱ्ह्यांना थोडी संजीवनी मिळत आहे; पण पावसाच्या अनियमिततने बळिराजाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे साकडे घालत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपात धानाची लागवड केली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे आता रोवणीयोग्य होत असून, त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात १ ते ३० जूपर्यंत १९२.८ मिमी पाऊस पडतो, तर यंदा या कालावधीत २०८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. यंदा पाऊस सलग होत नसल्याने नदी, नाले, तलाव अजूनही कोरडे पडले असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर सुरुवातीपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणे साहजिक आहे. मात्र, हवामान विभागाने ८ जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कालावधी चांगला पाऊस झाल्यास रोवणी करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र, पावसाने दगा दिल्यास व पंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

दुबार पेरणीचे संकट नाही मागील आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, रोवणीची कामे खोळंबली आहेत. पाऊस अधृूनमधून जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे पऱ्ह्यांना संजीवनी मिळत आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते पाणी करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही. 

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकून झाले आहे. आपल्या भागात जुलैनंतरच दमदार पावसाला सुरुवात होते. त्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही. - गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 

देव अशी परीक्षा दरवर्षी घेतो मागील दोन-तीन वर्षांपासून कधी ओल्या, तर कधी दुष्काळाला तोंड देत आहे. यंदादेखील हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आताच पाऊस दगा देत असल्याने पुढे काय अशी चिंता सतावत आहे. - राहुल बिसेन, शेतकरीवातावरणातील बदलाचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनियमित पावसामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेती आता बेभरवशाची झाली आहे. - मनोज दमाहे, शेतकरी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती