अनुदानासाठी शिक्षकांची दोन जिल्ह्यात पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:33+5:30

संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, पटोले यांनी, यांनी विनाअनुदानित प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या.

Teachers march in two districts for grants | अनुदानासाठी शिक्षकांची दोन जिल्ह्यात पदयात्रा

अनुदानासाठी शिक्षकांची दोन जिल्ह्यात पदयात्रा

Next
ठळक मुद्देअनुदानासाठी आगळे-वेगळे आंदोलन : विधानसभा अध्यक्षांच्या घरावर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : अनुदान मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेच्यावतीने शनिवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातून पायी दिंडी काढण्यात आली. दिंडी थेट विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सुकडी (भंडारा) येथील निवासस्थानी धडकली.यावर पटोले यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. मोतीदास उके, उपाध्यक्ष सुनील डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे, सहसचिव प्रा.डि.सी.कटरे, सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेली दिंडी रविवारी (दि.९) दुपारी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्या घरी पोहचली. दरम्यान, पटोले यांनी, यांनी विनाअनुदानित प्राध्यापकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र १४६+१६३८ कनिष्ठ महाविद्यालयांना २४ फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १०७ कोटींचा निधी मंजूर झालेल्या अनुदान निधी वितरणाचा शासन निर्णय काढून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्याचे व अघोषित कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानासह घोषित करण्याबाबतच्या निवेदनावर कार्यवाही करण्यात यावी असे स्वत:च्या सहीचे पत्र उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांना पाठविले. तसेच बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. या पायी दिंडी आंदोलनात एच. टी. क. महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डब्ल्यू.कुरेशी, संघटनेचे सचिव प्रा. हेतराम चुटे, सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष मनोज मस्के, प्रा. भाष्कर लांजेवार, प्रा. रवि कटरे, प्रा. प्रविण मेंढे, प्रा. मधू दिहारी, प्रा. एम. एल.पटले, प्रा.एस.बी.रंगारी, अर्जुनी-मोरगाव तालुका प्रमुख प्रा. एम. जे. रामटेके, प्रा.आर.झेड.गौतम, प्रा. आरती कठाणे, प्रा. गजभिये, प्रा. उके तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

Web Title: Teachers march in two districts for grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.