शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

टाकरीत माकडांचा हैदोस

By admin | Updated: February 23, 2015 02:05 IST

सतत चार-पाच महिन्यापासून टाकरी तसेच परिसरातील शेतात उभ्या कडधान्याच्या पिकांवर माकडाचा उपद्रव सुरू आहे.

आमगाव : सतत चार-पाच महिन्यापासून टाकरी तसेच परिसरातील शेतात उभ्या कडधान्याच्या पिकांवर माकडाचा उपद्रव सुरू आहे. या हैदोसामुळे गावकरी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहेत. वनविभागाने त्वरित या माकडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच तारेश्वरी गौतम व उपसरपंच श्यामसुंदर खोब्रागडे यांनी केली आहे.गावातील नागरिकांचे कवेलूचे घर तयार केले आहेत. या कवेलूवरुन माकडाचा मोठा घोळका उड्या मारून इकडून तिकडे जात असतो. त्यामुळे कवेलूचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. यामुळे नवीन कवेलू घेतल्याशिवाय गरीब नागरिकांना पर्याय नाही. पावसाळ्यापूर्वी नवीन कवेलू घरावर टाकण्यात आल्या नाही तर पावसाचे पाणी घरात घुसून घराची नासधुस झाल्याशिवाय राहणार नाही. गावाला लागून असलेल्या शेतात तूर, हरभरा व इतर कडधान्याचे पीक आहेत. त्या पिकावर माकडाचा समूह घोळक्याने जाऊन हातात आलेले पिक ते नष्ट करीत आहेत. एकटे शेतात कुणी शेतकरी जाऊ शकत नाही. माकडाला हाकलण्याचा प्रयत्न केला तर माकड हाकलणाऱ्या व्यक्तीवर माकड हल्ला चढवितात. यामुळे गावात माकडाची भिती निर्माण झाली आहे. वनविभागाने या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)