स्वॅब नमुन्यांचा अहवाल लांबणीवर,चिंतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:00 AM2020-04-07T05:00:00+5:302020-04-07T05:00:39+5:30

दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.

Swab patterns reportedly prolonged, raising concerns | स्वॅब नमुन्यांचा अहवाल लांबणीवर,चिंतेत वाढ

स्वॅब नमुन्यांचा अहवाल लांबणीवर,चिंतेत वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे३६ जण होम क्वारंटाईन : ७८ जणांच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र संपूर्ण विदर्भातील नमूने याच ठिकाणी तपासले जात असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील ७८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. परिणामी आरोग्य प्रशासन आणि संबंधितांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.
दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली प्रवासाचा संदर्भ असणाºया एकूण ५९ जणांना आत्तापर्यंत कुडवा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १९ जणांना सुध्दा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशा एकूण ७८ जणांच्या स्वॅबचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र याचा अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.मागील चार दिवसांपासून अहवाल प्राप्त न झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता नमुन्यांचा अहवाल केव्हा प्राप्त होणार हे निश्चित सांगता येणार नाही असे सांगितले.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र संपूर्ण विदर्भातील नमूने याच ठिकाणी तपासले जात असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे मागील चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील ७८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. परिणामी आरोग्य प्रशासन आणि संबंधितांच्या चिंतेत वाढ झाल्याचे चित्र आहे.
दिल्ली येथे एका समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमा दरम्यान दिल्ली निजामुद्दीन येथे प्रवासाचा संदर्भ असणाºया जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. दिल्ली प्रवासाचा संदर्भ असणाºया एकूण ५९ जणांना आत्तापर्यंत कुडवा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. गोंदिया येथील कोरोना बाधीत युवकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १९ जणांना सुध्दा आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. अशा एकूण ७८ जणांच्या स्वॅबचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मात्र याचा अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.मागील चार दिवसांपासून अहवाल प्राप्त न झाल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता नमुन्यांचा अहवाल केव्हा प्राप्त होणार हे निश्चित सांगता येणार नाही असे सांगितले.
 

Web Title: Swab patterns reportedly prolonged, raising concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.