शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

धान वाचविण्याची धडपड

By admin | Updated: January 4, 2015 23:16 IST

येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून यंदा सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेड अभावी खरेदी करण्यात आलेले धान उघड्यावरच पडलेले आहे.

६५५३ क्विंटल धान खरेदी : अकाली पावसाने उडविली तारांबळ देवरी : येथील आदिवासी विविध सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून यंदा सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी करण्यात आले आहे. शेड अभावी खरेदी करण्यात आलेले धान उघड्यावरच पडलेले आहे. अशात मागील दोन दिवसांपासून येत असलेल्या अवकाळी पावसामुळे धान ओले होत असून त्यावर ताडपत्री घालून वाचविण्याची धडपड केली जात असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादीत धानाला निश्चित हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धानाची खरेदी केली जाते. यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत दोन लाख ३१ हजार ८८६.८१ क्विंटल धान खरेदी केले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असला तरी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. शेतकऱ्यांच्या उत्पादीत धानाला योग्य प्रमाणात भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यात यावी, यासाठी आदिवासी विकास महामंडळाच्यामाध्यमातून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्यावतीने जिल्ह्यात ४० धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने सहा हजार ५५३ क्वींटल धान खरेदी केली आहे. गोडाऊन अभावी खरेदी करण्यात आलेले हे धान उघड्यावर पडून आहे. त्यात मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून उघड्यावर पडून असलेले हे धान पावसात ओले होत आहे. अशात या धानाला वाचविण्यासाठी त्यावर ताडपत्री टाकून वाचविण्याची धडपड केली जात आहे. पावसाचा फटका खरेदी केंद्रावरील धानाला बसत आहे. याशिवाय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेले धानही पावसाच्या तावडीत आले आहे. संस्थेकडे ताडपत्री उपलब्ध असली तरी खरेदी केलेल्या धानावरच ती आच्छादीत केली आहे. मात्र, शेतकऱ्यांचे हजारो क्विंटल धान पाण्याने भिजले आहेत. (प्रतिनिधी)