शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात सहा केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

तालुक्यात २० हजार ६०० हेआर धानाची लागवड करण्यात आली तसेच सडक-अर्जुनी तालुक्यात १९ हजार ३८८ हक्टर आर लागवडीकरीता १८ धान खरेदी कार्यान्वित आहेत. परंतु आमगाव तालुक्यात धान पिकाची लागवड जात असून सुद्धा फक्त तीन सहकारी शेतकी धान खरेदी विक्रीचे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देजि.प.स्थायी समितीचा ठराव : जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यात २० हजार ६२७ हेक्टर आर धानाची लागवड होत असून सुद्धा फक्त तीन धान खरेदी केंद्र कार्यान्वित आहेत. यामुळे शेतकऱ्यांना व्यापाºयांकडे धान विकावा लागत आहे. करिता १ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सहा केंद्र मंजुरीबाबत ठराव घेण्यात आला.आमगाव तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. तालुक्यात २० हजार ६०० हेआर धानाची लागवड करण्यात आली तसेच सडक-अर्जुनी तालुक्यात १९ हजार ३८८ हक्टर आर लागवडीकरीता १८ धान खरेदी कार्यान्वित आहेत. परंतु आमगाव तालुक्यात धान पिकाची लागवड जात असून सुद्धा फक्त तीन सहकारी शेतकी धान खरेदी विक्रीचे केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी गावातील व्यापाऱ्यांना अल्पदरात धान विक्री करावी लागत आहे. करीता तालुक्यात सहा धान खरेदी केंद्र आमगाव, गोरठा, कालीमाटी, कट्टीपार, तिगाव, अंजोरा या ठिकाणी सुरु करण्यात यावे. सदर ठिकाणी मोठे गोदाम उपलब्ध असल्याचे कारण सांगून ग्रामीण भागात धान खरेदी केंद्र सुरु करता येत नाही ही बाब योग्य नसल्याचे समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगीतले.तसेच पुढे गोदाम लहान स्वरुपाचे असल्यावर महामंडळाने धान केंद्रावरुन वेळेच्या वेळी धानाची वाहतूक करण्याची सोय करावी किंवा वर्गकाटांचे मोजणी करुन धान खरेदी केंद्राला नोंद घेवून सरळ महामंडळाला धान जमा करावे किंवा आदिवासी संस्थेप्रमाणे मोकळ्या जागेवर धान खरेदी करण्याच्या मंजुरीचे शासनास सादर करावे. मंजुरी प्राप्त होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी असेही हर्षे, गंगाधर परशुरामकर यांनी सभागृहाला सुचविले.यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी ठराव पारित करुन जिल्हाधिकाºयांना पाठविण्यात आला. सभेत जि.प.सदस्य हर्षे यांच्या मुद्दयांना समितीचे सदस्य गंगाधर परशुरामकर, पी.जी.कटरे यांनी सहकार्य केले.शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लाटआमगाव तालुक्यात तीन खरेदी केंद्र उपलब्ध आहेत. पण सदर केंद्र आमगाव येथे असल्याने शेतकºयांना २० ते २५ किमी. पर्यंत धान विक्रीस आणण्यास मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यावेळी त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकरीता शासन व खरेदी विक्री संस्थेच्या संचालकांनी धान खरेदी केंद्र वाढवून केंद्रस्तरावर धान खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी बैठकीत केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी