या धुळीला कुणीतरी थांबवा हो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:19+5:30

रस्ता कामात अनियमितता, सुरक्षाविषयक साहित्याचा अभाव, रस्त्यावर धुळच धूळ अशा अनेक समस्या गोरेगाव-गोंदिया रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना येत आहेत. वाहन चालवित असतांना वाहनचालकांना धुळीचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Someone has to stop this dust | या धुळीला कुणीतरी थांबवा हो

या धुळीला कुणीतरी थांबवा हो

Next
ठळक मुद्देप्रवाशांसह वाहनचालकांची आर्त हाक : गोरेगाव-गोंदिया मार्ग

दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोरेगाव-गोेंदिया रस्त्याच्या कामामुळे सध्या वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरील धुळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतुकीच्या कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. या रस्त्याने वाहन जाताच या धुळीला कुणीतरी थांबवा हो अशी आर्त हाक प्रवाशांसह वाहन चालक देत असल्याचे चित्र आहे.
रस्ता कामात अनियमितता, सुरक्षाविषयक साहित्याचा अभाव, रस्त्यावर धुळच धूळ अशा अनेक समस्या गोरेगाव-गोंदिया रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांना येत आहेत. वाहन चालवित असतांना वाहनचालकांना धुळीचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आजपर्यंत रस्त्यावर चिखल होते. पण कंन्ट्रक्शन कंपनीने गुरुवारपासून गोरेगाव-गोंदिया रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली. आता रस्त्यावर चिखल नाही पण धुळीने सर्वाना हैरान करुन सोडले आहे.
पंधरा दिवसांपासून या रस्त्याचे बंद होत ते गुरूवारी सुरु करण्यात आले. रोलर फिरवून खड्यात मुरुम टाकून दबाईचे काम सुरु होते.गोरेगाव-गोंदिया या सिमेंट रस्ता बांधकाम मागील एक वर्षापासून सुरु आहे. दोन्ही बाजूने रस्ता खोदकाम करुन अनेक दिवसांपासून संथगतीने सिमेंट रस्त्याचे काम सुरु होते.त्यामुळे सदर रस्ता दिलेल्या वेळेत पूर्णत्वास येईल का याविषयी शंका आहे.

बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका
मागील दोन महिन्यापासून गोरेगाव-गोंदिया रस्त्याच्या समस्येमुळे वाहन चालक आणि गावकरी त्रस्त आहे.याबाबत मोठी ओरड सुरू असताना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला योग्य दिशा निर्देश देण्याचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे या विभागाच्या बघ्याच्या भूमिकेमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. बांधकाम विभागाने कंत्राटदाराला साधी नोटीस सुध्दा बजावली नसल्याने या विभागावर किती दडपण आहे हे दिसून येते.
लोकमतचे मानले आभार
लोकमतने रस्ता बांधकामाच्या संथ गतीने सुरु असलेल्या कार्यप्रणालीवर मालीका सुरु केल्यावर सुज्ञ नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.गुरूवारी कंत्राटदाराने रस्त्यावरील रस्त्यावरील खड्डे बुझविण्याचे काम सुरू केले.गोरेगाव-गोंदिया मार्गाला सुरुवात करण्यापूर्वी कंत्राटदाराने मुरुमाचे उत्खनन करुन रस्त्यावर मुरुम टाकून दबाई केली.त्यानंतर पावसाळा सुरु झाल्यामुळे मुरुम उत्खननाचे काम बंद केले. मुरुम नसल्यामुळे रस्त्याचे पुढील काम करण्यात अडचण येत असल्याची माहिती आहे.

Web Title: Someone has to stop this dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.