शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिबिरातून शोधले ‘समाधान’

By admin | Updated: January 7, 2015 22:55 IST

विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र

सर्वसामान्यांना लाभ : सर्व विभागप्रमुखांनी लावली हजेरीसडक/अर्जुनी : विविध लोककल्याणकारी योजना शासनाकडून राबविण्यात येतात. मात्र त्यांची माहितीच सर्वसामान्य जनतेचा नसते. त्यांना एकाच जागी या योजनांची माहिती देण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देऊन साहित्यांचे वाटप करण्यासाठी येथे ‘समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राजकुमार बडाले यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.येथील तहसील कार्यालयात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील जि.प. सदस्य सर्वश्री रुपाली टेंभुर्णे, जागेश्वर धनबाते, मिलन राऊत, पंचायत समिती सभापती निर्मला उईके, उपसभापती दामोधर नेवारे व सरपंच पंचफुला अंबादे यांची उपस्थित होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, शासन सर्वसामान्य माणूस आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. अशाप्रकारच्या शिबिरामधून त्यांना माहिती मिळण्यास मदत होत आहे. जलयुक्त शिबिर अभियान यशस्वीतेसाठी लाभार्थ्यांचा व लोकांचा सहभाग मिळण्यास मदत होत आहे. जलयुक्त शिबिर अभियान यशस्वीतेसाठी लाभार्थ्यांचा व लोकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याची पाण्याची व्यवस्था, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास निश्चित मदत होईल.जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातुन अनेक उपक्रम शिबिर फेरफार करण्यास मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास मदत होत आहे. यामधून शासन निर्णयांचे वाचन, ई-निविदांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार एन.जे. उईके यांनी प्रास्ताविकातून डिसेंबर २०१४ अखेर ४५० विविध दाखल्यांचे वाटप, ८७४ फेरफार, १०३ गावात चावडी वाचन, १०३ गावात आदिवासी जमीन धारकांच्या जमिनीबाबत नोंदी पुर्ण, ३०८६ संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, ४२०३ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १७७२ इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १७१ इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, २३ इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना लाभार्थी, १०२ राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना लाभार्थी, १२६५२ आम आदमी विमा योजना लाभार्थी, २७५२ आम आदमी शिष्यवृत्ती योजना लाभार्थी, ११७ आम आदमी विमा नैसर्गिक मृत्यू दावे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.संचालन ए.पी. मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार मदनलाल चुर्रे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार उपस्थित होते. शिबिराला सडक अर्जुनी परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होती. (तालुका/शहर प्रतिनिधी)