गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा सिंदीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:14+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणार विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह परिसर अभ्यास आणि शेती करण्याचे आणि स्वयंशासनाचे धडे दिले जात आहे. सिंदीपार येथे केळीच्या बागा, बोरी, भाजीपाला, टरबूज आदी नगदी पिके घेणारी आधुनिक शेती केल्या जाते.या गावातील नागरिकही शिक्षित आहेत.

Sindipar, an ideal school for quality education | गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा सिंदीपार

गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा सिंदीपार

googlenewsNext
ठळक मुद्देसामान्य ज्ञानात विद्यार्थी तरबेज : परिसर अभ्यासावर भर, अत्याधुनिक साधनाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : शिक्षणाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टीकोण आता बदलत चाललाय. प्रत्येक पालक आपल्या मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आर्थिक बोजा सहन करायला तयार आहे. अशीच एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धडपडणारी शाळा म्हणजे जि.प.प्राथमिक शाळा सिंदीपार होय.
सडक अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राबविण्यात येणार विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह परिसर अभ्यास आणि शेती करण्याचे आणि स्वयंशासनाचे धडे दिले जात आहे. सिंदीपार येथे केळीच्या बागा, बोरी, भाजीपाला, टरबूज आदी नगदी पिके घेणारी आधुनिक शेती केल्या जाते.या गावातील नागरिकही शिक्षित आहेत. आधुनिक शेतीपासून ते कोणत्याही क्षेत्रात भरारी घेण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज असल्याचे येथील गावकरी सांगतात.त्यामुळेच आपल्या पाल्यांना शाळेत चांगले शिक्षण मिळावे यासाठी ते लोकसहभागातून शाळेला नेहमी सहकार्य करीत असतात. गावकऱ्यांकडून मिळणारे सहकार्यामुळेच येथील शिक्षकांनी शाळेच्या गुणवत्तेची दिशा बदलण्याचा निर्धार केला. बदललेली शिक्षण पद्धती, तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, दिक्षा अ‍ॅप, युट्यूब, दुरदर्शनवरील मिराकास्टच्या माध्यमातून विषय ज्ञान सुलभ होण्याच्या दृष्टीने दाखविलेले दृश्य आदींचा वापर करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. शाळेतील प्रसन्न व निसर्गरम्य वातावरणात मुलांना मनोरंजक व खेळीमेळीच्या वातावरणात शिकविले जाते. ज्ञानरचनावादाच्या शैक्षणिक साहित्यातून मुलांच्या गणित व इंग्रजी, मराठी विषयात तरबेज केले जात आहे.
मुख्याध्यापक आर.आर.बोरकर यांच्या मार्गदर्शनाखली सुभाष कठाणे या उमद्या शिक्षकाने नवकल्पना आणून गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठीतील एक मुळाक्षर एक सामान्य ज्ञान अशा अभिनव पद्धतीने शिक्षण देऊन वाचनाबरोबरच इतर ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. वर्गातील चेंडूच्या माध्यमातून एकक, दशक, संकल्पना, बेरीज, वजाबाकी, पाढे इत्यादी संकल्पना मुलांमध्ये रूढ केली जात आहे. इंग्रजी हे तर आजच्या आधुनिक शिक्षणाचे मूळ गुणसूत्र त्यामुळे इंग्रजी वाचनाबरोबर संवादावर देखील भर देण्याचा प्रयत्न या शाळेतील शिक्षक करित आहेत.
 

Web Title: Sindipar, an ideal school for quality education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.