हात दाखवा बस थांबवा हे केवळ ब्रीदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:20+5:30

प्राप्त माहितीनुसार २२ फेब्रुवारीला सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील बॅरि. राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हरदोलीला जाण्यासाठी कॉलेजमधून निघाली. तेव्हा सकाळचे १०.४५ वाजले होते. सदर विद्यार्थिनी चौकापर्यंत पोहोचण्याच्या थोड्याच अंतरावर असताना देवरीला जाणारी बस क्रमांक एमएच ०७-९३६३ या बसला हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला.

Show your hand Stop the bus is the only breather | हात दाखवा बस थांबवा हे केवळ ब्रीदच

हात दाखवा बस थांबवा हे केवळ ब्रीदच

googlenewsNext
ठळक मुद्देबस चालकांची मनमानी । विद्यार्थिनींना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळ विविध योजनांची अंमलबजावणी करते. एसटीला प्रवाशी मिळावे व ज्यादा नफा मिळावा यासाठी बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने हात दाखवा बस थांबवा हे बीद्र वाक्य अंमलात आणले आहे. मात्र प्रवाशी आणि विद्यार्थिनीनी हात दाखवूनही बस चालक बस थांबवित नसल्याने ही ब्रीद वाक्य केवळ नावापुरतेच ठरत आहे.
प्राप्त माहितीनुसार २२ फेब्रुवारीला सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील बॅरि. राजाभाऊ कला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हरदोलीला जाण्यासाठी कॉलेजमधून निघाली. तेव्हा सकाळचे १०.४५ वाजले होते. सदर विद्यार्थिनी चौकापर्यंत पोहोचण्याच्या थोड्याच अंतरावर असताना देवरीला जाणारी बस क्रमांक एमएच ०७-९३६३ या बसला हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने बस थांबविली नाही. त्याच बसच्या मागे डोमाटोला बस होती. मात्र या दोन्ही बसला विद्यार्थिनीने हात दाखवून सुध्दा बस थांबविली नाही. परिणामी सदर विद्यार्थिनीला बराच वेळ ताटकळत राहावे लागले. ११ वाजतापूर्वी बस असते, असे सांगून सदर विद्यार्थिनीने शिक्षकांना सुटी मागितली होती. मात्र बस न थांबविल्याने नाहक त्रास सहन करावा लागला.
एसटी महामंडळाने ‘हात दाखवा-बस थांबवा’ ही योजना सुरु केली असली तरी प्रत्यक्षात मात्र वेगळे चित्र पहायला मिळते. एस.टी.चे चालक फक्त बस थांबा किंवा विशिष्ट चौकातच बस थांबवितात. पण बस थांबा किंवा चौकाच्या पुढे गाडी निघाल्यास प्रवासी हात देऊनही बस थांबवित नाही. पासधारक विद्यार्थी असतील तर चालक मुद्दाम गाडी थांबवित नाही. किंवा थांबलीच तर वाहक मागे गाडी येत आहे त्या गाडीने या, असे सांगतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी ताटकळत राहतात. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून या मार्गावर सुरु असून याकडे आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची समस्या कायम आहे.

तक्रारी करुनही दखल नाही
विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी बस चालकांच्या मनमानी कारभारामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने याची गोंदिया व देवरी आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार केली. मात्र अद्यापही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

विद्यार्थिनींनी बस ला हात दाखविल्यानंतर वाहकाने बस थांबविणे आवश्यक आहे. मात्र बस न थांबविणाºयावर चालकावर तक्रार प्राप्त होताच निश्चित कारवाई केली जाईल. पालकांनी सुध्दा असा प्रकार घडत असल्यास याची लेखी तक्रार आगाराकडे करावी.
- संजना पटले, आगार प्रमुख, गोंदिया.

Web Title: Show your hand Stop the bus is the only breather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.