शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर रूग्ण झोपतात जमिनीवर

By admin | Updated: February 23, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील रूग्णांची तोबा गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढली. या वाढत्या रूग्णांमुळे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे सांगून ...

लोकमत विशेषगोंदिया : जिल्ह्यातील रूग्णांची तोबा गर्दी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात वाढली. या वाढत्या रूग्णांमुळे केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील खाटा अपुऱ्या पडत असल्याचे सांगून उपचार करून वेळीच घरी जा असे सांगितले जाते. तर काहींना खालीच झोपावे लागत आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा आहे. मात्र या रूग्णालयात २०० खाटांची सोय नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोकांना उपचार केल्यानंतर लगेच उपचार करून घरी पाठविण्यात येते. काहींना खाटा दिल्या जात नसल्यामुळे त्यांना खालीच जागा मिळेल तिथे झोपावे लागते. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातील रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शनिवारी हा प्रकार प्रकर्षाने जाणवला. कुडवा येथील सौरभ अनिल वडीचार (१५) याला आपल्या पायाचे प्लास्टर काढून दुसरे प्लास्टर लावायचे होते. त्यासाठी तो रूग्णालयात आला होता. मात्र त्याला खाट न दिल्यामुळे त्याला त्याच्या आईवडीलांनी आपल्या खुर्चीवरच झोपवून आपल्या मांडीचा आधार दिला. कुडवा येथील संतोष दलीराम गजभिये (४९) यांनाही झोपायला खाट नसल्यामुळे ते तासनतास स्ट्रेचरवरच पडून होते. गराडा येथील वामन दयाराम बावनकर (४०) यांच्या पायाचे प्लास्टर करण्यात आले. परंतु त्यांनाही खाट उपलब्ध नसल्यामुळे त्यांना तासनतास रूग्णालयातील खुर्चीवर बसून राहावे लागले. गराडा येथील बाळकृष्ण बाबूराव बावनकर (४५) हे अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात १५ दिवस तरी दाखल करणे गरजेचे असतांना त्यांच्या पायाला प्लास्टर करून त्यांना डॉक्टरांनी घरी जाण्यास सांगितले. प्लास्टर झाले परंतु पायाची हालचाल करता येत नसतानाही त्या रूग्णांना तिथून घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला. रूग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून त्यांना तेथून घरी जाण्याचा सल्ला दिला जातो. यावर त्या रूग्णांनीे चक्क रूग्णालयाच्या प्रवेश दारावर असलेल्या वऱ्हांड्यालाच आपले आराम करण्याचे स्थान बनविले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांनाही केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात खाटा दिल्या जात नाही. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असल्याची रूग्णांची तक्रार वाढतच चालली आहे. (तालुका प्रतिनिधी)अनेक रूग्ण रेफर टू नागपूरएकमेव शासकीय जिल्हा सामान्य रूग्णालय असल्यामुळे गरिब रूग्ण या केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात धाव घेतात. परंतु अनेक रूग्णांना गंभीर असल्याचे सांगून नागपूरला रेफर केले जाते. अपघातातील जखमी असोत किंवा जळालेले रूग्ण असोत त्यांना रेफर टू नागपूर केले जाते.रूग्णांची पिळवणूकगरिब रूग्ण उपचार घेण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात आल्यास त्यांना त्यांचा आजार गंभीर असल्याचे सांगून खासगी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठविले जाते. काही डॉक्टर स्वत:च्या खासगी रूग्णालयात, तर काही दुसऱ्या खासगी डॉक्टरांकडे अनेक रूग्णांना रेफर करतात. काही डॉक्टरांचे खासगी रूग्णालयाशी साटेलोटे असल्यामुळे त्यांना कमीशन देण्यात येत असल्याचे बोलले जाते. गरिब रूग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे.