शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकाऱ्यांशी रेती माफियांची साठगाठ

By admin | Updated: November 20, 2014 22:54 IST

संपूर्ण राज्यात संतुलित पर्यावरणासाठी पाण्याची भूजल पातळी वाढावी व प्रदूषणावर आळा बसावा यासाठी सर्वच रेतीघाट शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे रेती उपसा बंद होवून शासकीय व निमशासकीय

परसवाडा : संपूर्ण राज्यात संतुलित पर्यावरणासाठी पाण्याची भूजल पातळी वाढावी व प्रदूषणावर आळा बसावा यासाठी सर्वच रेतीघाट शासनाने बंद केले आहेत. त्यामुळे रेती उपसा बंद होवून शासकीय व निमशासकीय संपूर्ण कामे बंद झाली. तरीही काही ठिकाणाहून मोठे रेती माफिया टिप्परने रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. त्यांना पकडण्याची अधिकाऱ्यांची हिंमत होत नाही. त्यामुळे महसूल अधिकारी व रेती माफिया यांच्यात साठगाठ असल्याची चर्चा तिरोडा तालुक्यात होत आहे.लहान ट्रॅक्टरधारक व शेतकऱ्यांवर रेती माफियांच्या इशाऱ्यावर अधिकारी कारवाई करून गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोप होत आहे. तिरोडा तालुक्यातील चांदोरी (बिरोली), घाटकुरोडा, अर्जुनी, पिपरिया हे रेतीघाट भू-जल सर्व्हेक्षणानुसार पात्र असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अर्जुनी व बोंडरानी घाट वन विभागात येत असल्याने अडचणीत आहेत. त्यासाठी केंद्र शासनाच्या भोपाल येथील पर्यारण विभागाकडून मंजुरी घेतल्याशिवाय लिलाव करता येत नाही. परंतु ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा न घेताच उपविभागीय अधिकारी महिरे ठराव लिहिण्यास बाह्य करीत असल्याचे काही ग्रामसेवकांचे म्हणणे आहे. ग्रामसभा जोपर्यंत निर्णय देणार नाही, तोपर्यंत त्या ठरावासाठी साधे नाहरकरत प्रमाणपत्र ग्रामसेवकाला देता येत नाही. पण चारही रेती घाटांच्या नाहरकत प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय अधिकारी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत, अशी माहिती गावातील नागरिक व संघटनेकडून देण्यात आली आहे. हेच अधिकारी एकीकडे कायदा व सुव्यवस्थेच्या गोष्टी करतात तर दुसरीकडे दबाव टाकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नवनिर्वाचित आमदारांनी याची दखल घेवून सामान्य जनतेला न्याय द्यावे, अशी मागणी आहे. टिप्परमुळे संपूर्ण रस्ते खराब झाले आहेत. गावात संपूर्ण खड्डे असून नदीच्या घाटावर चालता येत नाही. गावात धुळीचे साम्राज्य असते. लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. बालके रस्त्याने जातात व भरधाव वेगाने ट्रक चालविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार केली, पण फायदा काहीच होत नाही.दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी महिरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, शासनाला महसूल मिळावा यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामसभेचा ठराव घेण्यासाठी सांगितले जाते. त्यात कोणतेही दबावतंत्र नसल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)