ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित

By Admin | Updated: May 5, 2016 01:57 IST2016-05-05T01:57:10+5:302016-05-05T01:57:10+5:30

मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे.

Setting up of defense forces to fight OBC conflict | ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित

ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित

गोंदिया : मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे. तसेच लवकरण रक्षा दल गठित करण्यात येणार असल्याचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील वातावरण सामाजिक न्यायमंत्र्यांनी ओबीसी समाजाबाबत काढलेल्या अपशब्दाचा उच्चार, आ. गोपालदास अग्रवाल व पंकज यादव यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणांमुळे चांगलाच तापला. मात्र अद्याप कुणावरही काहीही कारवाई झालेली नाही. यापूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ गेडाम यांना तत्कालीन जि.प. उपाध्यक्षाने केलेली मारहाण व न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी मोरे यांना झालेल्या मारहाणीमुळेही जिल्ह्यात वातावरण तापले होते. कोणत्याही समाजाचे मारपीट करणे किंवा करवून घेणे, अशा घटनांमुळे कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आली असल्यामुळेच ओबीसी संघर्ष कृती आता रक्षा दल गठित करणार असल्याचे बबलू कटरे यांनी कळविले आहे.
काही स्वार्थी संधिसाधू ओबीसींचे नेते, कार्यकर्ते व मीडियाच्या सोबत्यांवर संघष समिती लक्ष ठेवून आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांना सबक दिला जाईल. अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजावण्यासाठी ओबीसी रक्षक दल गठित होत आहे. शिवाय तसेच ओबीसी संघर्ष कृती समिती तालुकानिहाय, सामाजिक द्वेष कमी करण्यासाठी समन्यव समिती, ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी कर्मचारी संघर्ष कृती समित्यासुद्धा गठित करण्यात येत आहेत. त्याचे चांगले-वाईट परिणाम सर्वांना भोगावे लागतील, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा अन्यापूर्ण घटना घडल्यास त्वरित सूचित करा, त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आवाहन बबलू कटरे यांनी केले आहे.

Web Title: Setting up of defense forces to fight OBC conflict