शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांची निवड

By admin | Updated: March 30, 2016 02:01 IST

जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली.

जलयुक्त शिवार : २५७९२ हेक्टर सुरक्षित सिंचन क्षमता निर्माणगोंदिया : जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली. आता १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातील दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षाच्या टप्प्यात गोंदिया तालुक्यातील-१०, गोरेगांव-११, तिरोडा-९, अर्जुनी/मोरगाव-९, आमगांव-९, देवरी-११, सालेकसा-८, सडक/अर्जुनी-१० अशा एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. जलसमस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासोबत सिंचनासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणे हा या जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश आहे. चालू आर्थिक वर्षातील ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामांवर २५ मार्च २०१६ पर्यंत ३२ कोटी ७२ लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. सन २०१६-१७ या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांमध्ये जलस्त्रोत मजबूज करण्यासाठी कामे केली जाणार आहेत. प्रत्येक नागरिक त्या दृष्टीने जलसाक्षर होत असून जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दीकडे जाण्यासाठी आता या अभियानाला लोकचळवळीचे स्वरु प प्राप्त झाले आहे. विविध तलाव, नाले, साठवण बंधारे, बोडीतील २ कोटी ६४ लाख रु पयांचा १ लक्ष ११ हजार ६०० घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामातून २५ हजार ७९२ हेक्टर एवढी मोठी सुरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत सलग समतल चर, मातीनाला बांध, मजगी दुरूस्ती, गॅबियन पध्दतीचे बंधारे, शेततळी, सिमेंट नाला बांध बांधणे व दुरु स्ती करणे, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण व सरळीकरण, केटी वेअर, तलावातील गाळ काढणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वन तलाव, भात खाचरे दुरु स्ती, साठवण बंधारे, बोडी खोलीकरण/जुन्या बोडी दुरु स्ती, तलाव खोलीकरण/तलाव दुरूस्ती, माजी मालगुजारी तलाव दुरु स्ती, लघु पाटबंधारे तलाव दुरूस्ती अशी एकुण ११०५ कामे होती घेण्यात आली. त्यापैकी ९२२ कामे पूर्ण करण्यात आली. पूर्ण झालेल्या कामातून निर्माण झालेला जलसाठा १८ हजार ५४ सहस्त्र घनमीटर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दुबार पिकांसाठी लाभदायकगाव शिवारातील पाणी गावातच साठविल्यामुळे जमीनीवरील आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शाश्वत जलसाठा निर्माण होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून तयार झालेल्या जलसाठ्यामुळे कृषी उत्पादन क्षमता वाढली आहे. दुबार पिक घेण्यास या अभियानाचा महत्वाचा हातभार लागला आहे. उत्पादन क्षमतेत झालेली वाढ व दुबार पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.