शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी मजूर कामापासून वंचित

By admin | Updated: January 7, 2015 22:54 IST

रेशीम विभागांतर्गत कोसा प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या हंगामी कामगारांंना कामापासून वंचित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे.

अर्जुनी-मोरगाव : रेशीम विभागांतर्गत कोसा प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या हंगामी कामगारांंना कामापासून वंचित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. सदर प्रकल्पामध्ये नवीन मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जात असल्याने गेल्या १३ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.कोसा प्रकल्पामध्ये हंगामी काम असते. या हंगामात मजूर कामावर ठेवले जातात. गेल्या १३ वर्षांपासून काम करणाऱ्या मजुरांना डावलून नवीन मजुरांना कामावर ठेवले जाते. अधिकाऱ्यांना ही बाब समजावून सांगितल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने कामगारांनी संघटना स्थापन करुन कामगार आयुक्तांकडे दाद मागितली. कामगार आयुक्तांनी स्थानिक रेशीम विकास अधिकाऱ्यांना जुन्या मजुरांना कामावर घेण्यासाठी बजावले. मार्च ते जून या कालावधीत जास्त मजुरांची कामावर गरज नसल्याने मजूर कामावर ठेवा, पण आळीपाळीने कामावर घ्या, असे निर्देश दिले. मात्र जुन्या मजुरांना कामावर न घेता नवीन मजुरांना कामावर घेवून अन्याय करीत असल्यामुळे जुन्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे.मागील महिन्यात जुन्या मजुरांना कामावर घेण्याचे पत्र संघटनेतर्फे देण्यात आले होते. या पत्राची पोच देण्यात आली. मात्र माहिती अधिकाराच्या अर्जावर पोच न देता अर्ज फेकल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यापद्धतीने संबंधित विभागाकडून मजुरांची हेळसांड केली जात आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन जुन्या मजुरांना प्रथम प्राधान्य देऊन कामावर घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)