शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पांगोली वाचवा सिंचन क्षमता वाढवा

By admin | Updated: January 5, 2015 23:07 IST

पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट

गोंदिया : पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्हा सीमेवर वाघ नदीत तिचा विलय होतो. गोंदिया व गोरेगाव या दोन्ही तालुक्यातील शेतकरी पिकासाठी पांगोली नदीच्या पाण्यात अवलंबून असतात. हजारो शेतकरी कुटुंबांचा या पाण्यावर उदरनिर्वाह चालतो. मात्र सद्यस्थितीत ही नदी प्रदूषणग्रस्त झाली असून तिचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांवर भविष्यात संकट येवू शकते. मात्र या नदीला वाचविण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत.पांगोली नदीच्या पुनरूत्थानासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने पुढाकार घेत नदीचे निरीक्षण केले. यात त्यांना नदीचे पात्र उथळ होत चालले असून काठावरील गावात व शहरात पाण्याची पातळी सतत खालावत आहे. नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असून काठावरील वृक्षांच्या अवैध कत्तली होत आहेत. त्यामुळे नदीचे काठच नष्ट होत आहे. काठावरील माती नदीत साचल्याने खोली कमी झाली. शिवाय शासनाने अद्यापही या नदीवर कुठेही बांध किंवा बंधारे बांधले नाही. त्यामुळे पाणी कुठेही अडविले जात नसून सरळ वाहून जाते व परिसरातील पाण्याच्या पातळीवर दुष्परिणाम होत आहे. पांगोली नदी व सहायक नाल्यांवर दूषित पाण्याचे निर्जंतुकीकरण व सांडपाणी पुनर्वापर व्यवस्थापन प्रकल्पांची शासनाकडून उभारणी न करण्यात आल्याने पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पाळीव पाण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.या प्रकारामुळे काठावरील शेतपिकांना वर्षभर पाणी मिळत नाही. त्यामुळे फक्त खरीप हंगामातच केवळ धानपीक घेतले जाते. रबी किंवा उन्हाळी पीक फळभाज्या, पालेभाज्या, इतर नगदी पिके, कडधान्य व तृणधान्य घेण्याचे धाडसच शेतकरी करीत नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरत आहे. शिवाय शेतीकामे सोडून शेतकरी मोल-मजुरीच्या कामावर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)कारखाने व आरोग्यावर दुष्परिणामशहरातून वाहणाऱ्या या नदीकाठावर व मिळणाऱ्या नाल्यांकाठी राईस मिल्स, चामडे उद्योग, लाख कारखाने, टाईल्स कारखाने व प्रशासकीय मंजुरी असलेले इतर कारखाने आहेत. या कारखान्यांतून वाहणारे दूषित पाणी व राईस मिलच्या राखेमुळे नदी प्रदूषित होत आहे. त्या पाण्याचा वापर नागरिक व जनावरे करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. राईस मिलच्या चिमणीतून सतत निघणाऱ्या धुरापासून वायू प्रदूषण होत आहे. शिवाय याच पाण्याचा वापर काठावरील शेतपिकासाठी होत असल्याने नापिकी वाढत आहे.