मंत्राने कोरोना पळवा, २५ लाखांचे बक्षीस मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST2021-05-16T04:28:03+5:302021-05-16T04:28:03+5:30

निंबा : या जगात भूत, भानामती, तंत्र-मंत्र, जादूटोण्याचे अस्तित्व नाही. ज्योतिषाला स्वत:चे भविष्य माहीत नसते. कोरोना येणार हे एकाही ...

Run Corona with the mantra, get a prize of 25 lakhs | मंत्राने कोरोना पळवा, २५ लाखांचे बक्षीस मिळावा

मंत्राने कोरोना पळवा, २५ लाखांचे बक्षीस मिळावा

निंबा : या जगात भूत, भानामती, तंत्र-मंत्र, जादूटोण्याचे अस्तित्व नाही. ज्योतिषाला स्वत:चे भविष्य माहीत नसते. कोरोना येणार हे एकाही ज्योतिषाने सांगितले नाही. जादूटोणा करून मच्छर मरत नाही. चमत्कार कोणीही करू शकत नाही. देवी-देवता अंगात येत नसतात. अंधश्रद्धा समाजाला लागलेली कीड आहे. अंधश्रद्धा सोडा व देशाला महान बनवा. मंत्राने कोरोना पळवा व २५ लाखांचे बक्षीस मिळवा, असे खुले आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष गोंदियाचे एस.एस. चव्हाण यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामााजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समतादूत विभाग गोंदियाद्वारा आयोजित ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी योगिता ब्राह्मणकर होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा कळसकर, करुणा मेश्राम, मुनेश रहांगडाले, मनीष बिजेवार, संदेश उके, राजरत्न मेश्राम, पुरुषोत्तम मानकर हे होते. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन समतादूत साजन वासनिक यांनी केले. आभार महेंद्र कटबरिये यांनी मानले.

Web Title: Run Corona with the mantra, get a prize of 25 lakhs