शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रॉनिक वजनाने ग्राहकांची लूट

By admin | Updated: January 3, 2015 23:06 IST

जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात

गोंदिया : जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक वजनात बराच घोळ पहायला मिळत आहे. वजन माप निरीक्षक प्रत्यक्ष भेटीत केवळ नूतनीकरणाची पावती बघून मोकळे होतात. इलेक्ट्रॉनिक काट्यात लहानापासून तर मोठ्यापर्यंत बऱ्याच दुकानात सेटिंग असल्याचे समजते. पाच किलो क्षमतेच्या काट्यात ५० ग्रॅम वजनाची सेटिंग तर १०, २०, ३०, ५०, १००, ५०० किलो वजनाच्या काट्यात दुकानदाराच्या इच्छेने सेटिंग केली जाते. इलेक्ट्रॉनिक काटे विक्रीकरिता घरपोच सेवा असल्याने सेटिंग करण्याला अडचण येत नाही. दुकानदाराच्या समोरच ही व्यवस्था केली जाते. त्यामुळे वर्तमानात ९० टक्के दुकानात इलेक्ट्रॉनिक काट्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्राहकांची पडद्याआडून लूट केली जात आहे. वजन माप निरीक्षकांनी जर हे काटे तपासून सहानिशा केली तर हा प्रकार बंद झाला असता. पण, असे होतांना दिसत नाही.पाकीटबंद वस्तू विक्रीला असताना त्यावर उत्पादक किंमत, वजन, उत्पादन दिनांक योग्यतेची तिथी नोंद असते. उत्पादन स्थानावरु न ही वस्तू हजारो किमीचा प्रवास करीत व्यवहारात हजर होते. यामुळे त्या पाकीटवर उत्पादकांनी लिहिलेले कमी-जास्त प्रमाणात खोडतोड होते. व्यापारीही खरेदी बिल तपासून विक्र ी किंमत ठरवते. मात्र अशावेळी वजनमाप निरीक्षक नेमकी हीच अडचण समोर करुन व्यापाऱ्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून कार्यवाही कंपनीवर करून दुकानदाराकडून चिरीमिरी मागितली जाते. हा प्रकार दोन वर्षापासून सगळीकडेच जोमात सुरु झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दिशेने तपास करु न सामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)