लाईफ लाईन एक्स्प्रेसचे २३ वर्षांनी पुनरागमन

By Admin | Updated: April 24, 2016 01:56 IST2016-04-24T01:56:08+5:302016-04-24T01:56:08+5:30

सन १९९३ मध्ये जिल्ह्यात एक इतिहास घडविल्यानंतर २३ वर्षांच्या कालावधीनंतर लाईफ लाईन एक्स्प्रेसचे जिल्ह्यात पुनरागमन होत आहे.

Return to Life Line Express after 23 years | लाईफ लाईन एक्स्प्रेसचे २३ वर्षांनी पुनरागमन

लाईफ लाईन एक्स्प्रेसचे २३ वर्षांनी पुनरागमन

युवा जागृतीने घेतले होते शिबिर : राज्यपालांनी दिली होती भेट
गोंदिया : सन १९९३ मध्ये जिल्ह्यात एक इतिहास घडविल्यानंतर २३ वर्षांच्या कालावधीनंतर लाईफ लाईन एक्स्प्रेसचे जिल्ह्यात पुनरागमन होत आहे. येथील युवा जागृती संस्थेच्या माध्यमातून लाईफ लाईन एक्स्प्रेसने सुमारे २८ दिवस जिल्ह्यात शिबिर लावून रूग्णांना सेवा व उपचार दिला होता.
त्या शिबिराचे मुख्य आयोजक गोंदियातील युवा जागृती ही संस्था होती. या शिबिरासाठी राजीव गांधी फाऊंडेशन (दिल्ली) व भंडारा जिल्हा परिषदेने आर्थिक मदत केली होती. येथील लोको शेड परिसरात अस्थायी राजीव गांधी नगरची स्थापना करण्यात आली होती. तर नगर परिषद शाळेत शस्त्रक्रिया पश्चात रूग्णांना ठेवले जात होते. या शिबिरासाठी नागपूर व वर्धा मेडीकल कॉलेजमधील सुमारे ८८ सर्जन, १८ बधिरीकरण तज्ञ व नर्सेसनी आपली सेवा दिली होती.
शिबिरात पोलिओग्रस्तांच्या ३५०, कानाच्या ९६, डोळ््यांच्या ४५० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच ३१९ चश्मे, २७२ कॅलीपर्स वितरीत करून २५ लेंस लावण्यात आले होते व ९०५० ओपीडी रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. या शिबिराला माजी राज्यपाल पी.सी.अलेक्जेंडर, अकम्मा अलेक्जेंडर, खासदार प्रफुल पटेल, आमदार हरिहरभाई पटेल, गोपालदास अग्रवाल, डीआरएम, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष टोलसिंग पवार यांनी भेट दिली होती. विशेष म्हणजे फ्रांस येथील पत्रकारांनी या शिबिराला भेट देऊन तेथील वृत्तपत्र व पुस्तकांत नोंद केली होती. शिबिरासाठी नगर परिषद, हलवाई होटल असोसिएशन आदींनी सहकार्य केले होते, अशी माहिती अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी दिली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Return to Life Line Express after 23 years