शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेल्याच्या धक्क्याने राणे यांचा मृत्यू

By admin | Updated: January 8, 2015 22:57 IST

सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेची मान्यता आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र शाळेत करण्यात येणार आहे.

प्रशासन जबाबदार : पत्नी, मुले-मुली, कुटुंब उघड्यावरसालेकसा : सालेकसा तालुक्यातील इठाई आश्रमशाळेची मान्यता आदिवासी आयुक्त नाशिक यांच्या पत्रान्वये रद्द करण्यात आली आहे. त्यातील कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र शाळेत करण्यात येणार आहे. तोपर्यंत त्यांचा पगार देण्यात यावा, असे आदेश तत्कालीन अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर पल्लवी दराडे यांनी सर्व प्र्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेले आहे. तरीसी आॅगस्ट ते डिसेंबर २०१४ या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. याच विवंचनेत एका कर्मचाऱ्याने जीवनयात्रा संपविली.ईठाई आश्रम शाळेचे स्वयंपाकी सुखदेव राणे यांचा चार महिन्यांपासून पगार झाला नाही. शाळेची मान्यता रद्द झाली. नवीन ठिकाणी देवलभट्ी, ता. अहेरी जि.गडचिरोली येथे रूजू होण्यास अप्पर आयुक्त आदिवासी नागपूर यांनी सांगितले.तेथे शाळेत गेल्यावर जागा रिक्त नाही म्हणून उलट पावली परत पाठविण्यात आले. ही माहिती नागपूर कार्यालयाला देण्यात आली. पुन्हा वाट बघण्याचा सल्ला देण्यात आला. प्रधान सचिव यांच्या बैठकीत समायोजित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन समायोजित करण्यात येईपर्यंत कालावधीचे प्रलंबित वेतन अदा करण्याची कार्यवाही अप्पर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांच्यावर राहील असा स्पष्ट आदेश असतानाही प्रकल्प अधिकारी देवरी यांनी सुखदेव राणे यांचे चार महिन्याचे वेतन दिलेले नाही. नोकरी गेली, नवीन शाळेत रूजू करीत नाही, ४ महिन्यापासून पगार नाही या मानसिक धक्याने राणे यांचा तोल जाऊन त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना गोंदिया येथे केटीएस रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांना नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. रुपये नसल्यामुळे त्यांना परत गावी आणण्यात आले. खासगी डॉक्टरांचा उपचार सुरू असतानाच ६ जानेवारी २०१५ ला कौटुंबिक विवंचना व मानसिक धक्यामुळे राणे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी, दहा वर्षाची मुलगी, ८ वर्षाचा मुलगा, आई-वडील यांच्यावर उदरनिर्वाहचा गंभीर प्रसंग निर्माण झालेला आहे. या राणे यांच्या मृत्यूस पागर चार महिने न देणारे प्रकल्प अधिकारी दोषी आहेत, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. आता अनुकंपा तत्वावर राणे यांच्या पत्नी यांना शासनाने नोकरीत घ्यावे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. अन्यथा कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वारंवार प्रशासनाकडे तक्रार नोंदवूनही काही उपयोग झाला नाही. जेथे आपण सेवा दिली तेथेच आपल्याला न्याय मिळत नसेल तर जगायचे कसे, या विवंचनेत ते सतत राहयचे, असेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे.(तालुका प्रतिनिधी)