कोविड ड्युटीतील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व वेतनवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:09+5:30

कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्यावा, या कालावधीत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करावा, ....

Provide incentive allowance and pay hike to teachers on covid duty | कोविड ड्युटीतील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व वेतनवाढ द्या

कोविड ड्युटीतील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व वेतनवाढ द्या

Next
ठळक मुद्देशिक्षक भारती संघटना : उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोविड ड्यूटीतील शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व वेतनवाढ द्या यासह अन्य मागण्यांना घेऊन शिक्षक भारती संघटनेने शनिवारी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन केले. यांतर्गत, संघटनेच्यावतीने उपजिल्हााधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, कोविड ड्यूटी केलेल्या शिक्षकांना बदली रजा मंजूर करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद घ्यावी, कोविड ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता व विशेष वेतनवाढ लागू करावी, कोविड ड्यूटीवर मरण पावलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांना ५० लाखांची मदत तातडीने द्यावी, कोरोनाची लागण झाल्यामुळे झालेल्या उपचाराचा खर्च तातडीने द्यावा, या कालावधीत काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून त्यांचा वापर ऑनलाइन शिक्षणात करावा, ऑनलाईन शिक्षणात मोबाइलऐवजी टेलिव्हिजनचा वापर सुरु करावा, ऑनलाइन शिक्षण प्रभावीपणे देण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची साधने उपलब्ध करून द्यावीत (टॅबलेट, अ‍ॅड्रॉईड फोन), शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर न टाकता त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनावर द्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांचे सॅनिटायझेशन करावे, शाळांना थर्मल स्कॅनिंग मशीन, सॅनिटायझर, मास्क हॅण्डग्लोज इत्यादी सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे, कोरोना काळात विद्यार्थ्यांना वर्कबुक व अ‍ॅक्टिव्हिटी बुक द्यावे, कोरोनामुळे स्थलांतरित गरीब, दलित, मागासवर्गीय व भटक्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळेत विनाअट प्रवेश द्यावा, कोरोना काळात अनुदान, पगार, महागाई भत्ते इत्यादींमध्ये कपात करू नये, मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेतील उपस्थिती शाळा सुरू होईपर्यंत बंधनकारक करू नये, ५५ वर्षे वयावरील आश्रमशाळा कर्मचाºयांना शाळेत बोलविण्यात येऊ नये आदी मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांचे निवेदन शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश खवले, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनील मांढरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांना दिले.शिष्टमंडळात शिक्षक भारती माध्यमिक विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, विभागीय अध्यक्ष प्राथमिक प्रकाश ब्राम्हणकर, शिक्षक भारती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. डी. मेश्राम, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवाने, प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरडे, अनिल मंत्री, पालांदुरकर, कार्यवाह टी.एस.गौतम, बी. एम. कोसरकर, पी.डी.चव्हाण, संतोष डोंगरे, संतोष बारेवार, राजु टेंभरे, संतोष मेंढे, श्याम बावने, दिलीप रहांगडाले, असीम बनर्जी, एस.बी.मेंढे, ए.टी.डुंभरे उपस्थित होते.

Web Title: Provide incentive allowance and pay hike to teachers on covid duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.