शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पुन्हा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.

ठळक मुद्देगोंदिया महसूल मंडळात अतिवृष्टी : १९.२ मि.मी.पावसाची नोंद, रबीतील हरभरा,गहू भूईसपाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यातच बुधवारी (दि.९) रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गोंदिया तालुक्यात ६६ मि.मी.पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १९.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे गहू आणि हरभरा पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. तर आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला.पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. तर ११ जानेवारीपर्यंत पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने या नुकसानीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस अधून मधून पडत असल्याने धान खरेदी केंद्रावर ठेवलेल्या धानाला अंकुर फुटले आहे. त्यामुळे या धानाची खरेदी करणार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.यंदा जिल्ह्यात एकूण ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे.यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर गहू आणि हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक पूर्णपणे भूईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पंचनामे करुन नुकसान भरपाईअवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका १० हजार हेक्टरमधील गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात या दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढणारजिल्ह्यात मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे रब्बी हंगामातील तूर आणि इतर पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस