अवकाळी पावसाचा धान पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:19+5:30

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील शेतकऱ्यांना बसला. खरीप हंगामातील हलका धान निसवला असून कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी करुन तो विक्रीसाठी आणणू दिवाळी साजरी करतात. मात्र तीन चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले धान भिजले.

Pre-monsoon rains hit crops | अवकाळी पावसाचा धान पिकांना फटका

अवकाळी पावसाचा धान पिकांना फटका

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात तीन चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा धान पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. पावसामुळे कापणी केलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या गेल्या. यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्टÑवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका सडक अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील शेतकऱ्यांना बसला. खरीप हंगामातील हलका धान निसवला असून कापणीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी दिवाळीपूर्वी हलक्या धानाची कापणी करुन तो विक्रीसाठी आणणू दिवाळी साजरी करतात. मात्र तीन चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेले धान भिजले.काही भागात जोरदार पाऊस झाल्याने बांध्यामध्ये पाणी साचल्याने धान सडला. त्यामुळे धानाच्या कळपा काळ्या पडला असून धान पाखड झाला.अवकाळी पावसाचा चारशे ते पाचशे हेक्टरमधील धान पिकाला बसला.यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीदारांना दिलेल्या निवेदनातून केली. शिष्टमंडळात जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,डॉ.अविनाश काशिवार, प्रमोद लांजेवार, चंद्रसेन कापगते, ग्यानीराम कापगते, देवाजी पर्वते, शिवदास डोंगरवार,विनायक डोंगरवार,शांतीलाल कापगते,गुलाब डोंगरवार यांचा समावेश आहे.

Web Title: Pre-monsoon rains hit crops