शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

मार्किंगच्या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 6:00 AM

बाजारपेठेतील रस्ते आधीच अरूंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यांचे वाहन रस्त्यांवर उभे करावे लागतात.यातूनच शहरात ठिकठिकाणी ट्राफीक जामची समस्या निर्माण होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोहीम राबविली जाते.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग : व्यापाऱ्यांचे सामान आत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यापारी आपले सामान रस्त्यावर मांडून करीत असलेल्या अतिक्रमणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने मार्कींगचा प्रयोग अंमलात आणला. या प्रयोगाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.परिणामी, रस्त्यावरील अतिक्रमणाची समस्या तुर्तास सुटली आहे.बाजारपेठेतील रस्ते आधीच अरूंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यांचे वाहन रस्त्यांवर उभे करावे लागतात.यातूनच शहरात ठिकठिकाणी ट्राफीक जामची समस्या निर्माण होते. हे अतिक्रमण काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून मोहीम राबविली जाते. मात्र काही दिवसांनी स्थिती ‘जैसे थे’ होते व व्यापारी सामान रस्त्यांवर मांडून मोकळे होतात. इंदिरा गांधी स्टेडियमसमोरील फुटपाथ दुकानदारांकडून सर्वाधिक अतिक्रमण केले जात असल्याचे दिसते.यावर तोडगा म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी मंगळवारी (दि.२६) फुटपाथ व्यापाऱ्यांना बोलावून मार्कींगचा प्रयोग अंमलात आणण्याबाबत चर्चा केली. तसेच सर्वांच्या सहमतीने लगेच फुटपाथ दुकानांसमोर ५ फूट जागा सोडून मार्कींग करण्यात आली. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडून या प्रयोगाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात असल्याचे दिसत आहे. म्हणूनच हा रस्ता आता मोकळा झाला आहे.पाच व्यापाऱ्यांवर केली कारवाईव्यापाऱ्यांकडून अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला सहकार्य केले जात असतानाच एका व्यापाऱ्याने नियम तोडल्याने गुरूवारी (दि.२८) त्याला वाहतूक नियंत्रण शाखेने दंड ठोठावला. त्याचप्रकारे भाजी बाजारात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली.विशेष पथकाचे केले गठनवाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा मोहीम राबविते. मात्र काही दिवसांनी मोहीम बंद पडते.अशात व्यापारीही पुन्हा अतिक्रमण करून मोकळे होतात व जैसे थे स्थिती निर्माण होते. मात्र आता ही मोहीम सातत्याने राबविण्यासाठी तायडे यांनी विशेष पथकाचे गठन केले आहे. यात तीन कर्मचारी असून तायडे स्वत: त्यांच्यासोबत राहून बाजारात फिरून पाहणी करतील. कुणीही अतिक्रमण करून वाहतुकीला अडचण निर्माण करतांना दिसल्यास त्याला लगेच दंड ठोठावला जाणार आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस