शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ पोलिसानेच केला कट रचून खून

By admin | Updated: February 28, 2017 00:59 IST

डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १८ जानेवारी रोजी पळसगाव ते जांभळी रस्त्यावर एका पुरुषाचा मृतदेह पडल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

काठ्यांनी बदडले : पाच आरोपींना अटकगोंदिया : डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १८ जानेवारी रोजी पळसगाव ते जांभळी रस्त्यावर एका पुरुषाचा मृतदेह पडल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सदर मृत व्यक्ती कोण आहे याचा शोध घेत असताना पोलिसांना त्या व्यक्तीचा कट रचून खून झाला असून तो खून बडतर्फ पोलिसानेच केला असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.मृत व्यक्तीचे नाव कामराज संपत राऊत असे असून तो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गर्रा/बघेडा येथील असल्याचे निष्पन्न निघाले. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी संशयीत विनोद सांडेकर देव्हाडी ता.तुमसर याला ताब्यात घेतले व विचारपूस केली असता मृतक कामराज राऊत व विनोद सांडेकर हे मित्र होते. लोकांना फसवून नोकरी लावून देतो असे सांगून पैसे घेण्यामध्ये ते तरबेज होते अशी माहिती मिळाली. कामराज राऊत याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते व आरोपी विनोद सांडेकर यास त्यापैकी काही पैसे नोकरी लावून दे असे म्हणून दिले होते. परंतू नोकरी लागत नसल्याने अनेकदा कामराज राऊत हा विनोद सांडेकर याच्याकडे दिलेले पैसे मागण्यासाठी तगादा लावत होता. परंतू मटका व जुगार खेळण्याचा शौकीन असलेल्या विनोद सांडेकर याचेकडून हे पैसे खर्च झाले होते. त्यामुळे कामराज यालाच संपविण्याचा कट विनोद सांडेकर याने रचला व त्यासाठी विलास बावणे, अनिल उईके, मनोहर रु खमोडे, गणेश देवगडे यांना एक लाख रु पयांची सुपारी दिली. त्यानुसार १७ जानेवारी रोजी तुला पैसे देतो असे सांगून कामराज याला विनोद सांडेकर व गणेश देवगडे यांनी मोटारसायकलवर तुमसरवरून सडक/अर्जुनी तालुक्यातील मालीजुंगाच्या घनदाट जंगलामध्ये आणले. तिथे सर्वांनी मिळून काठ्यांनी मारून कामराजचा निर्घृन खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह मोटरसायकलवर ठेवून मालीजुंगा-पांढरी-पळसगाव या मार्गे जांभळी/दोडकीकडे जाणाऱ्या रोडवर नाल्यामध्ये फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनामध्ये डुग्गीपारचे ठाणेदार केशव वाभळे, पोलीस शिपाई शाम कोरे, अशोक जायभाये, सुखदास मेश्राम, इंद्रजीत भूते, सुरेंद्र चंद्रिकापुरे, संदीप शिवणकर, राहूल वाठोरे, विलास टेंभूर्णे व सायबर सेलचे पोलीस शिपाई दमाये यांनी केला.सूत्रधार सांडेकर २०१३ मध्ये बडतर्फया प्रकरणातील मूख्य सूत्रधार विनोद सांडेकर हा गोंदिया पोलीस दलामध्ये १९८८ साली पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. परंतू त्याच्या बेशिस्त वर्तनामुळे त्याला २०१३ मध्ये पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस कोणत्या प्रकारे कोणत्याही गुन्ह्याचा तपास करतात याची त्याला पूर्वकल्पना होती. त्यामुळे त्याने खून करतेवेळी व गुन्ह्याचा पुरावा नष्ट करतेवेळी योग्य ती खबरदारी घेतली होती. परंतू डुग्गीपार पोलीसांनी गुन्ह्याचा कसोशीने तपास करु न सर्व ५ आरोपींनी गुन्हा घडल्यानंतर कोणताही पुरावा नसताना शिताफीने माग काढत त्यांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.