शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

देवरीत भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याची चर्चा; कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, कारवाईची मागणी

By अंकुश गुंडावार | Updated: February 17, 2025 20:18 IST

असा प्रकार घडलाच नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे

देवरी (गोंदिया) : येथील एका परीक्षा केंद्रावर बारावी भौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न उत्तरांची झेरॉक्स प्रत लोकमतच्या हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा सोमवारी (दि.१७) उघडकीस आला. या प्रकारामुळे काॅपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

साेमवारी (दि.१७) बारावी विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका केंद्रावर त्याच शाळेतील एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने लोकमत प्रतिनिधीला नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर एकूण नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स सेंटरवर केंद्रावर आली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारात केंद्रावर अधिनस्त असलेले शिक्षक सामील तर नाहीत ना असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. तर हुशार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभागाचे भरारी पथक तसेच महसूल विभागाचे भरारी पथक हातावर हात धरून बसले असल्याचे चित्र देवरी शहरात पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे आता तरी शिक्षण विभागाने जागे होऊन सर्व केंद्रांवर धाडी टाकून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शिक्षण विभाग म्हणतो, असा प्रकार घडलाच नाही

या संदर्भात गटशिक्षणाधिकारी महेंद्र माेटघरे व उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एकाही केंद्रावर असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकारात कुठलेच तथ्य नसल्याचे सांगितले. तर देवरी येथील काही जागरूक नागरिकांनी नागपूर येथील उपसंचालकांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा