शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

स्थानकावरील वॅगनमधून पेट्रोलची चोरी

By admin | Updated: February 25, 2015 00:15 IST

मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडा तालुक्यातील काचेवानी रेल्वे स्थानकावर रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी होण्याचा प्रकार घडत आहे.

तिरोडा/काचेवानी : मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत तिरोडा तालुक्यातील काचेवानी रेल्वे स्थानकावर रेल्वे वॅगनमधून पेट्रोलची चोरी होण्याचा प्रकार घडत आहे. व्हॅगनचे नटबोल्ट ढिले करून व सील तोडून ही चोरी करण्यात येत असल्याची तक्रार काही सुज्ञ नागरिकांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र हा पेट्रोल चोरीचा प्रकार आहे की पेट्रोल गळतीचा हे स्पष्ट झालेले नाही. पाच महिन्यांपूर्वीपासून रेल्वेच्या मालवाहू टँकरमधून पेट्रोलची चोरी होत असल्याचा ँप्रकार काही नागरिकांच्या लक्षात येत आहे. अशीच घटना ७ फेब्रुवारी २०१५ च्या सकाळी १०.४५ वाजता सुरू असताना काही नागरिकांनी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यात वॅगनच्या खाली बॉटल लावून पेट्रोल जमा केले जात असल्याचे दिसून आले. मात्र ही पेट्रोल चोरी होती, की अनावश्यक झिरपत असलेले ते पेट्रोल बॉटलमध्ये भरल्या जात होते हे स्पष्ट होऊ शकले नाही. असाच प्रकार दि.२० फेब्रुवारीलाही घडला. त्या दिवशी वॅगनच्या दोन टँकरमधून पेट्रोल झिरपत असल्याचे दिसून आले. याच पद्धतीने ५ वर्षांपूर्वी गंगाझरी रेल्वे स्थानकावर वॅगनमधील पेट्रोल बॉटलमध्ये जमा केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी याची तक्रार रेल्वे विभागाला करण्यात आली होती. आता असेच प्रकरण काचेवानी रेल्वे स्थानकावर घडत आहे. काचेवानी स्थानकावर पेट्रोलची वॅगन नेहमीच थांबते. यात पेट्रोलच्या टँकरचे नटबोल्ट मुद्दाम ढिले करुन पेट्रोलची चोरी केली जात असल्याचा संशय नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार आर.टी.आय. कार्यकर्ते राजेश तायवाडे यांनी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि केंद्र व राज्य शासनाकडे केली आहे. मात्र नटबोल्ट ढिले करून पेट्रोलची चोरी होत असल्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाने फेटाळला आहे.२० फेब्रुवारीला तिरोड्याकडून काचेवानीकडे एक वॅगन येत असताना काचेवानी रेल्वे चौकीवर पेट्रोल झिरपत असल्याचे पाहण्यात आले. ही ट्रेन काचेवानी स्टेशनवर पोहोचताच चालक आणि गार्ड यांनी दोन टँकर मधून झिरपत असलेले पेट्रोल बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रयत्न केल्यावर सुध्दा पेट्रोल झिरपने बंद झालेले नव्हते. रेल्वे वॅगनमध्ये तेल घालणे आणि त्याला सील करणे ही तेल कंपनीची जबाबदारी आहे. पेट्रोल-डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्याने याची दखल कंपनीने दक्षतेने घ्यायला पाहिजे. रेल्वे प्रशासनाने अशा गंभीर घटनेची उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यायला पाहिजे. मात्र त्याकडे तेल कंपनी आणि रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करून कळून न कळल्यासारखे करीत आहेत. या हलगर्जीपणातून पेट्रोल चोरीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. रेल्वेच्या मालवाहू टॅँकर खाली बॉटल किंवा अन्य साहित्य लावून तेल जमा करण्याचा प्रयत्न केला तर याला कोणीही व्यक्ती चोरी करत आहे असे म्हणणे स्वाभाविक आहे. मात्र कंपनी आणि रेल्वे प्रशासनाने या समस्येला गांभिर्याने घेतलेले नाही. (शहर प्रतिनिधी)हा प्रकार मुद्दाम करीत नाहीया प्रकाराबाबत काचेवानी रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, एका ट्रेनमध्ये ५० वॅगन असतात. काही वॅगनचे व्हॉल्व किंवा नटबोल्ट चालत्या गाडीत ढिले झाल्याने तेल झिरपते. पेट्रोल झिरपल्याने आग लागण्याची भीती टाळण्याकरिता खाली प्लास्टिक बॉटल लावून ते जमा केले जाते. मात्र आजपर्यंत कोणीही कर्मचाऱ्यांने किंवा इतर कोणी मुद्दाम अशा पद्धतीने पेट्रोल-डिझेल काढून चोरी केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.नागरिकांनाही झाली सवयपरिसरातील १५ ते २० रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय अन्य नागरिकांना टॅकरमधून तेल चोरी संबंधात विचारण्यात आले असता नटबोल्ट ढिले करून तेल चोरी होत असल्याचे आम्ही पाहिले नसल्याचे ते म्हणाले. मात्र अनेक वेळा टॅकरमधून तेल झिरपत असल्याचे अनेकदा पाहण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तेल चोरी की, हा कंपनीचा बेजबाबदारपणा याचे मूळ कारण तपासणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.