शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटला

By admin | Updated: January 4, 2015 23:14 IST

साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येत असलेला वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने १९ जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना पुढील उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले.

देवरी : साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपून गावाकडे परत येत असलेला वऱ्हाड्यांचा ट्रॅक्टर उलटल्याने १९ जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना पुढील उपचारासाठी गोंदियाला हलविण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजता परसोडी गावाच्या चौकात हा अपघात झाला.प्राप्त माहितीनुसार भोयरटोला येथील राजकुमार ताराम याचे साक्षगंध चिचगड भागी या गावात होते. तो कार्यक्रम आटोपून ३० ते ३५ वऱ्हाडी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून गावाकडे परत येत होते. दरम्यान परसोडी गावाच्या चौकात रस्ता ओलांडणारा एक आॅटो अचानक समोर आल्याने ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर एका बाजुला केला. मात्र यात अनियंत्रित होऊन ट्रॅक्टर उलटला. यात मंगलाबाई राऊत (३५) रा.शिलापूर, शिलाबाई ताराम (४५) रा.बोरगाव, रोशनी नेवारे (१६) रा.शिलापूर, रामकला ताराम (३२) रा.शिलापूर, लिलाबाई ताराम (५५) रा.बोरगाव डवकी, सुमित ताराम (७) रा.शिलापूर या गंभीर जखमींवर देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गोंदियाला रवाना करण्यात आले. तर विमल वट्टी (४५) उर्मिला वट्टी (४५), कैलास राऊत (३०), नितू राऊत (९), जसवंता कवास (३०), छाया ताराम (२६), मनुबाई खांडवाये (४५), शिल्पा राऊत (१५) सर्व रा.शिलापूर, भागरथा धानगाये (४५) रा.पुराडा, भागरथा ताराम (५०) रा.बोरगाव, अंजना चुटे (४५) रा.भोयरटोला, कविता खांडवाये (३५) रा.जेठभावडा, दुर्गा भोयर (२२) रा.आवरीटोला यांच्यावर देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान पालकमंत्री राजकुमार बडोले व आ.संजय पुराम हे साखरीटोला येथील एका कार्यक्रमात असताना त्यांना या अपघाताचे वृत्त समजले. त्यांनी तातडीने देवरीचे ग्रामीण रुग्णालय गाठून जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. (प्रतिनिधी)