शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोटे यांनी घेतला विकास कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला.

ठळक मुद्देकामांना गती देण्याचे निर्देश : शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करा '

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयात आ.सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोटे यांनी सर्व विभागांकडून विकास कामांचा आढावा घेतला.बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, अप्पर तहसीलदार निवृत्ती उईके,नायब तहसीलदार ओमकार ठाकरे, बी.टी.यावलकर, देवरी तालुका कृषी अधिकारी तोडसाम, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटीया, माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया, माजी सभापती वसंत पुराम, तालुका महासचिव बळीराम काटेवार, तालुका उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, डॉ. अनिल चौरागडे, भैयालाल चांदेवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष सी.के.बिसेन, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके यांच्यासह पंचायत समिती, आरोग्य विभाग, वन विभाग, आदिवासी विकास प्रकल्प, आदिवासी विकास महामंडळ, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, पोलीस विभाग, नगर पंचायत आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागतील अधिकाऱ्यांकडून विकास कामाचा आढावा आ.कोरोटे यांनी घेतला. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची कामे प्राधान्याने करुन त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. प्रलबिंत असलेल्या विकास कामांना गती देऊन ही कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले.विकास कामे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष करणे खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही कोरोटे यांनी बैठकीत दिला. संचालन नायब तहसीलदार ओकांर ठाकरे यांनी केले तर आभार तहसीलदार विजय बोरुडे यांनी मानले.

टॅग्स :Socialसामाजिक