शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ग्रा.पं.ची करवसुली केवळ ४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मागीलवर्षी ग्रामपंचायतची मालमत्ताकर वसुली ६७.५७ टक्के तर पाणीपट्टी वसुली ६९.४४ टक्के होती. परंतु कोरोनामुळे यंदा ही वसुली केवळ ४ टक्के झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचरांचे वेतन मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. काही ग्रामपंचायतच्या परिवारांचे वेतन वर्षभरापासून काढण्यात आले नाही.

ठळक मुद्देगावगाड्याचा विकास थांबला : २७.५५ कोटींचे कर थकीत, कोरोना संक्रमणाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागाचा विकास ग्रामपंचायतल्या विविध कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते. परंतु कोरोनाच्या संकटामुळे ग्रामपंचायत संकटात आल्या आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींची मालमत्ता वसुली ४.३३ तर पाणीपट्टीकर वसुली ३.९४ टक्के आहे.९६ टक्के कर थकीत असल्याने ग्रामपंचायत कारभार कसा चालवायचा प्रश्न ग्रामसेवकांपुढे निर्माण झाला आहे.जिल्ह्यात मागीलवर्षी ग्रामपंचायतची मालमत्ताकर वसुली ६७.५७ टक्के तर पाणीपट्टी वसुली ६९.४४ टक्के होती. परंतु कोरोनामुळे यंदा ही वसुली केवळ ४ टक्के झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचरांचे वेतन मागील सहा महिन्यापासून रखडले आहे. काही ग्रामपंचायतच्या परिवारांचे वेतन वर्षभरापासून काढण्यात आले नाही. शासनाने करवसुलीच्या आधारावरच परिचरांचे वेतन करायचे असा नियम असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या परिचारांची आता मोठी समस्या झाली आहे. जिल्ह्यात सन २०२०-२१ च्या जून अखेरपर्यंतची परिस्थिती पाहिली असता जिल्ह्यातील ६ कोटी ३५ लाख ३ हजार ८९३ रूपये पाणीपट्टी तर २१ कोटी २० लाख ३२ हजार ६८ रूपये घरकर थकीत आहे. दोन्ही प्रकारचे कर घेतल्यास २७ कोटी ३५ लाखाच्यावर थकीत कर आहे. त्यामुळे गावातील विविध विकास कामे, सोबतच ग्रामपंचायत उत्पन्नातून करण्यात येणारी सर्व कामे रखडली आहेत.ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या परिचरांना आता उपाशी राहण्याची वेळ आली आहे.मागील सहा महिन्यांपासून वेतन झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांत तणाव वाढत आहे. गोंदिया जिल्ह्यात ३६ लाख ३ हजार ३५८ रुपये मालमत्ताकर वसुली जून अखेरपर्यंत वसूल करण्यात आली. जूनी आणि नवीन मिळून सन २०१९-२० व २०२०-२१२ ची ९६ लाख १८६९ रुपये घर कर वसुली करण्यात आली आहे. त्या वसुलीची टक्केवारी ४.३३ आहे. २१ कोटी २० लाख ३२ हजार ६८ रूपये थकीत आहेत. पाणीपट्टीकर वसुलीत ३.९४ टक्के वसुली झाली आहे. यात २६ लाख ५ हजार ६७८ रुपये पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला.६ कोटी ३५ लाख ३ हजार ८९३ रु पये पाणीपट्टी कर थकीत आहे. एकंदरीत ९६ टक्के पाणीपट्टी व मालमत्ताकर थकीत असल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार चालवायचा कसा हा प्रश्न ग्रामसेवकांना पडला आहे.तीन तालुक्यांची मालमत्ताकर वसुली शून्यगोंदिया जिल्हा परिषदेने जून अखेरपर्यंत घरकर व पाणीपट्टी कर या संदर्भात आढावा घेतला असता सालेकसा, देवरी व सडक-अर्जुनी या तीन तालुक्यातील घरकर व पाणीपट्टीकर वसुली शून्य आहे. गोरेगाव तालुक्याची पाणीपट्टीची कर वसुली टक्केवारी ०.३३ गृहकरात १.४७ टक्केच वसूली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत