पोलीस मुख्यालयाला ‘वनश्री’ पुरस्कार

By Admin | Updated: June 14, 2014 01:21 IST2014-06-14T01:21:45+5:302014-06-14T01:21:45+5:30

नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करणारी जेटीएससी

'Oneshree' award to the Police Headquarters | पोलीस मुख्यालयाला ‘वनश्री’ पुरस्कार

पोलीस मुख्यालयाला ‘वनश्री’ पुरस्कार

गोंदिया : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करणारी जेटीएससी प्रशिक्षण संस्था पोलीस मुख्यालय गोंदिया तर्फे सन २०१२-१३ मध्ये

पोलीस मुख्यालय कारंजाच्या परिसरात विविध प्रकारच्या ५००० रोपट्यांची लागवड करुन सदर परिसर वृक्षमय करण्यात आला आहे. त्यामुळे या जेटीएससी ला महाराष्ट्र

शासनाने वनश्रीचा पुरस्कार प्रदान केला आहे.
पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या प्रेरणेने जेटीएससी परिसर, पोलीस मुख्यालय व कर्मचारी वसाहत परिसरात हिरवळ तयार करण्यासाठी पाच हजार रोपटे लावण्यात

आले. सपोनि प्रबोधन येजरे, उपनिरीक्षक गौतम तायडे, पोलीस हवालदार ईश्वर अंबुले, मुस्तफा सरवर, नापोशि लिओनार्ड मार्टीन, विनोद कल्लो, नैलेश शेंडे, शिपाई वसीम

खान, प्रशांत मेश्राम, मनोज चुटे, महिला शिपाई वैशाली कुकडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांंच्या मदतीने पाच हजार रोपट्यांची लागवड व संगोपन करुन विविध ठिकाणी

पर्यावरणसंबंधी जनजागरण कार्यक्रम हाती घेतला. लोकांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. या उपक्रमाची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण

विभागातर्फे या संस्थेस छत्रपती शिवाजी महाराज ‘वनश्री पुरस्कार’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे ग्रामविकास व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते

जेटीएससी प्रभारी गौतम तायडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नक्षलवाद्यांना लढा देण्यासाठी

मुख्यालयात जणू जंगल तयार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'Oneshree' award to the Police Headquarters