शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी कृती समितीने व्यक्त केला पालकमंत्र्यांवर रोष

By admin | Updated: March 29, 2016 03:05 IST

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास

गोंदिया : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास वेळ देत नाहीत, चर्चा करीत नाहीत असा आरोप करीत ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध नारेबाजी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी ओबीसी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अन्यथा त्यांना गावबंदी, जिल्हाबंदी करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र आपण ओबीसी समाजाबद्दल कोणतेही अपशब्द बोललो नसताना काही लोक राजकीय भूमिकेतून अशा पद्धतीने आरोप करीत असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी स्पष्ट केले.गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, नॉन क्रिमिलेयरची मर्यादा वाढविणे, ओबीसी समाजाची जनगणना अशा अनेक मुद्द्यांवर ओबीसी संघर्ष कृती समितीचा संघर्ष सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री या नात्याने ना.बडोले यांनी सदर जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. यातूनच सोमवारी दुपारी ना.बडोले गोंदियातील सामाजिक न्यायभवनातील कार्यक्रम आटोपून निघत असताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी अमर वराडे, बबलू कटरे, बी.एम.करमकर, कैलाश भेलावे, आशिष नागपुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. आपल्या मागण्यांचे निवेदन ना.बडोले यांना देऊन चर्चाही करण्यात आली. मात्र त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली. ‘पालकमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, नॉन क्रिमिलेयरचे झाले काय, पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देणे सुरू केले. हा प्रकार पाहून पालकमंत्री चिडून अपशब्द बोलले, असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी- बडोले४काहीही कारण नसताना घोषणाबाजी सुरू केल्यामुळे मी एका ओबीसी कार्यकर्त्याला हा काय प्रकार आहे असे म्हणून नाराजी व्यक्त केली. पण ओबीसी समाजाचा अनादर होईल असे कोणतेही शब्द बोललो नाही. ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी आहे. केवळ तुम्ही ओबीसी समाजाचे आहे म्हणून ओबीसींचे नेते झाले असे नाही. मीसुद्धा ओबीसी समाजासाठी आपल्या विभागामार्फत शिष्यवृत्तीसाठी निधी मिळवून दिला. केवळ राजकीय भूमिकेतून काही लोक असा आरोप करीत असतील तर त्याला अर्थ नाही, अशा शब्दात ना.राजकुमार बडोले यांनी आपली बाजू सांगितली.