शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

जेवढे उद्दिष्ट तेवढ्या किट्स नाही तर चाचण्या करणार तरी कश्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याला ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र हे उद्दिष्ट अधिक असून दररोज ३२६० चाचण्या करण्याची क्षमताच नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडे १० किट्स उपलब्ध आहेत. दररोज ३२६० टेस्ट केल्या तर तेवढ्या किट्स असणे गरजे चे आहे. तर मनुष्यबळ देखील तेवढे हवे आहे. मात्र यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन सुरु केले आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.  

ठळक मुद्देआरोग्य विभागाने सुरु केले नियोजन : १० हजार किट्स उपलब्ध

    लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने मोहीम हाती घेतली आहे. यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार असून यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले. गोंदिया जिल्ह्याला दररोज ३२६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण तेवढ्या चाचण्या करण्याची क्षमता आणि किट्सच उपलब्ध नसल्याने एवढ्या चाचण्या पूर्ण करायच्या कश्या असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.  राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याला ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र हे उद्दिष्ट अधिक असून दररोज ३२६० चाचण्या करण्याची क्षमताच नाही. जिल्हा आरोग्य विभागाकडे १० किट्स उपलब्ध आहेत. दररोज ३२६० टेस्ट केल्या तर तेवढ्या किट्स असणे गरजे चे आहे. तर मनुष्यबळ देखील तेवढे हवे आहे. मात्र यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने शासनाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन सुरु केले आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.  

जिल्ह्याच्या तुलनेत उद्दिष्ट अधिक असल्याने समस्याशासनाने जिल्ह्याला दररोज ३२६० कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट नागपूर जिल्ह्यापेक्षा अधिक आहे. गोंदिया सध्या दररोज ८५० टेस्ट केल्या जात आहे. तर दररोज १३०० टेस्ट करणे शक्य आहे. मात्र ३२६० चाचण्या करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ देखील उपलब्ध नाही. त्यामुळे यात अडचण आहे.

निधीची अडचण नाही कोरोना चाचण्यासाठी लागणारे किट्स तसेच इतर साहित्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्या जाते. शासनाने दिलेले ३२६० चाचण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या निधीची तरी कुठलीच अडचण नाही. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे. त्यामुळे दररोज अधिकाधिक चाचण्या केल्या जातील. 

शासनाने जिल्ह्याला ३२६० कोरोना चाचण्या दररोज करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी किट्स तसेच आवश्यक सर्व साहित्य व किट्स उपलब्ध करुन दिल्या जातील. कुठलीही अडचण येणार नाही. - दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या