कोणत्याही रूग्णाला कुठल्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:05+5:30

जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात योजनांच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना खवले यांनी, या दोन्ही योजनांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रूग्णालयाविरूद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.

No patient should be sent back without medication for any reason | कोणत्याही रूग्णाला कुठल्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये

कोणत्याही रूग्णाला कुठल्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये

Next
ठळक मुद्देराजेश खवले : जिल्हा समितीच्या बैठकीत दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांना विविध आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहेत. या योजनांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यात अंगीकृत खाजगी रूग्णालयांची निवड केली आहे. या रूग्णालयांनी कोणत्याही रूग्णाला कोणत्याही कारणास्तव औषधोपचाराशिवाय परत पाठवू नये, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांनी दिल्या.
जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात योजनांच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना खवले यांनी, या दोन्ही योजनांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रूग्णालयाविरूद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. या योजनेंतर्गत ज्या रूग्णालयाचे काम समाधानकारक नाही त्यांना नोटीस बजावण्यात येईल. संबंधित रूग्णालयांनी येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला योजनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरून जास्तीत जास्त रूग्णांना या योजनेचा लाभ घेता येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाºया रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील योजनांची माहिती द्यावी असे सांगितले.
बैठकीला राज्य आरोग्य हमी योजनेचे जिल्हा समन्वयक, अंमलबजावणी सहाय संस्थेचे जिल्हा प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक व योजनांचे आरोग्य मित्र उपस्थित होते.

Web Title: No patient should be sent back without medication for any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य