धान चोरणाऱ्या नऊ जणांना अटक

By Admin | Updated: October 4, 2015 02:41 IST2015-10-04T02:41:14+5:302015-10-04T02:41:14+5:30

चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव बाजार येथील धान खरेदी केंद्रातील १६ कट्टे धान चोरणाऱ्या नऊ जणांना चिचगड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

Nine people arrested for stealing rice | धान चोरणाऱ्या नऊ जणांना अटक

धान चोरणाऱ्या नऊ जणांना अटक


गोंदिया : चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बोरगाव बाजार येथील धान खरेदी केंद्रातील १६ कट्टे धान चोरणाऱ्या नऊ जणांना चिचगड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
गुरूवारच्या सायंकाळी ७ वाजतादरम्यान नऊ आरोपींनी पीकअप गाडी (एमएच ३५, बी ३९८८) मध्ये १६ कट्टे धान टाकून चोरून नेले. सदर धान आठ हजार ७०४ रूपये किमतीचे आहेत. सदर घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात बोरगाव बाजार येथील मनोज रामलाल परतेकी (३०), नंदलाल दुधराम हटवार (४६) रा. फुटाणा, संताराम मोती मडावी (४५) आनंद ढकलू दर्रो (४५) दयाराम प्रितम कुंजाम (४६), फुटाणा येथील सोविंदा हरिचंद माहुरे (४२), सुभाष ताराचंद लाडे (४४), पंचराम फुलसिंग मंदाटेकन (५४) व मयाराम प्रीतम कुंजाम (५५) रा. बोरगाव बाजार या नऊ जणांना अटक करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nine people arrested for stealing rice