शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

न्यू नागझिरा, कोकाने भरली पर्यटनाची तिजोरी

By admin | Updated: January 6, 2015 23:02 IST

गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ या एकाच महिन्यात नागझिरा, न्यू नागझिरा व कोका

देवानंद शहारे - गोंदियागोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ या एकाच महिन्यात नागझिरा, न्यू नागझिरा व कोका अभयारण्यास तीन हजार ४३३ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून दोन लाख ३८ हजार ८६० रूपयांचा महसूल वन्यजीव विभागाला मिळाला.राज्यातील पर्यटकांसह परप्रांतीय पर्यंटकही येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. आॅन लाईन बुकींगच्या माध्यमातून नागझिरा, न्यू नागझिरा व कोका अभयारण्यात सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यात एकूण तीन हजार ४३३ पर्यटकांनी भेटी दिल्या आहे. त्यासाठी एकूण ४९६ वाहनांचा उपयोग करण्यात आला. पर्यटकांद्वारे मिळालेल्या शुल्कातून एकूण एक लाख ४६ हजार ७१० रूपयांचा महसूल जमा झाला. तर तिन्ही पर्यटन स्थळी उपयोगात आणलेल्या ४९६ वाहनांद्वारे एकूण ७१ हजार ६०० रूपयांचा महसूल गोळा झाला आहे. याशिवाय न्यू नागझिरा अभयारण्यात २५५ कॅमेऱ्यांचा उपयोग करण्यात आला. त्याद्वारे २० हजार ५५० रूपयांचा महसूल प्राप्त झाला.3यात नागझिरा अभियारण्याला एकूण ३६४ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून १४ हजार ६२५ रूपयांचा महसूल गोळा झाला. तर तेथे उपयोगात आणलेल्या ६७ वाहनांद्वारे आठ हजार ५५० रूपये सदर विभागाला प्राप्त झाले. नागझिरा अभयारण्य पर्यटनातून २३ हजार १७५ रूपयांचा महसूल संबंधित विभागाला प्राप्त झाला.न्यू नागझिरा अभयारण्याला एकूण दोन हजार ८४८ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून एक लाख २५ हजार ६९५ रूपयांचा महसूल जमा झाला. त्यासाठी पर्यटकांनी ३८८ वाहनांचा उपयोग केला. त्याद्वारे ५८ हजार ९५० रूपये गोळा झाले. त्यात पर्यटकांनी वापरलेल्या २५५ कॅमेऱ्यातून २० हजार ५५० रूपये मिळाले. न्यू नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनातून डिसेंबर महिन्यात एकूण दोन लाख पाच हजार १९५ रूपयांचा महसूल सदर विभागाला प्राप्त झाला.तसेच कोका अभयारण्याला एकूण २२१ पर्यटकांनी भेटी दिल्या. त्याद्वारे सहा हजार ३९० रूपयांचा महसूल जमा झाला. शिवाय वापरलेल्या ४१ वाहनांतून चार हजार १०० रूपये गोळा झाले. डिसेंबर महिन्यात कोका अभयारण्याच्या पर्यटनातून १० हजार ४९० रूपयांचा महसूल सदर विभागाला मिळाला.