शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त पिपरीया परिसर समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: January 6, 2015 23:04 IST

सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र पिपरीया समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. लोकप्रतिनिधींच्या निक्रियतेमुळे परिसराच्या विकासासाठी

सालेकसा : सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त क्षेत्र पिपरीया समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. लोकप्रतिनिधींच्या निक्रियतेमुळे परिसराच्या विकासासाठी येथील नवयुवकांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पिपरीया विकास परिषद संघर्ष यात्रेची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे शासनाला या क्षेत्राच्या विविध समस्यांची जाणीव करून दिली जात आहे.यामध्ये सालेकसा-रोंढा-गल्लाटोला या मुख्य मार्गाचे मजबूत डांबरीकरण, पिपरीया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे, अप-डाऊन करणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता तत्काळ थांबविणे, काबील कास्तकारांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे. पिरीया नवागड कालव्याच्या रस्त्यावर डांबरीकरण करणे, पुनर्वसीत नवागड (पिपरीया) येथे शासनाच्या पुनर्वसन विभागाकडून सुविधा उपलब्ध करून देणे, पिपरीया क्षेत्रात अवैध पशू व्यवसाय व गोहत्येसाठी जनावरांच्या निर्यातीवर प्रतिबंध लावण्यात यावे. रानीडोह उपसा जलसिंचन योजना सुरू करणे, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवरील गल्लाटोला नदीवर पुलाचे पक्के बांधकाम करणे, शिवगड मंदिराचा विकास करण्यात यावे. याशिवाय पिपरीया हे मोठे परिसर असून त्यात १८ टोल्यांचा सहभाग आहे. ही बाब लक्षात घेवून येथे शैक्षणिक सुविधा व उच्च शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करणे गरजेचे आहे. हे आदिवासीबहुल क्षेत्र असल्यामुळे आदिवासी लोकांची दिशाभूल करणाऱ्या व शैक्षणित कार्यात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. या भागातील अनेक कार्यरत शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास रखडला आहे. येथील शैक्षणिक बाब अत्यंत गंभीर असून शासनाने लक्ष न दिल्यास आदिवासी हा कायमचा आदिवासीच राहील, अशी खंत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)