शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर

By admin | Updated: July 17, 2014 00:10 IST

सध्या सुरू असलेल्या आंदोलनांच्या सत्रात आता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

शहरवासीयांना फटका : ५५६ कर्मचारी सहभागी
गोंदिया : सध्या सुरू असलेल्या आंदोलनांच्या सत्रात आता नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात पालिकेच्या ५३६ कर्मचाऱ्यांचा सहभाग असून यात सफाई कामगारांचाही समावेश आहे. यामुळे आधीच स्वच्छतेच्या बाबतीत बकाल असणाऱ्या गोंदिया शहराची स्थिती अधिकच बिघडणार आहे. त्यामुळे या आंदोलन शहरवासीयांना फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामसेवकांच्या आंदोलनाने ग्रामीण भागातील व्यवस्था भरकटलेली असतानाच आता नगर पालिकेचे कर्मचारीही बेमुदत संपावर गेले आहेत. महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनात येथील ५३६ कर्मचारी संपावर गेले आहेत.
राज्यातील नगर पालिका/ नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाने द्यावे, नगर पालिका मधील अनुकंपाधारकांच्या नेमणुकांसाठी स्थायी/ अस्थायी पदाची अट न घालता तत्काळ नियुक्त्या कराव्यात, शैक्षणिक पात्रता व मुळ विकल्प दिल्यानुसार लेखा शाखेत कर व प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना तत्काळ सामावून घेणे, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देणे तसेच सार्वजनिक सुट्यांचा मोबदला व शैक्षणिक पात्रतेनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती देणे, मुख्याधिकारी पदावर ५० टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, संवर्गातील कर्मचाऱ्यांनुसार मुख्याधिकारी पदाचा अतिरीक्त पदभार देणे, १२ वर्षे कालबद्ध पदोन्नती तसेच २४ वर्षांची दुसरी कालबद्ध पदोन्नती त्वरीत लागू करणे, नगर पालिकांना सुधारीत आकृतीबंध आराखडा तयार करणे, शासकीय कामाचा पाच दिवसांचा आठवडा लागू करणे यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
या आंदोलनात पालिकेतील रोजंदारी व स्थायी असे एकूण ५३६ कर्मचारी सहभागी आहेत. त्यांनी दुपारी पालिकेच्या आवारात निदर्शने केली. (शहर प्रतिनिधी)