शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजाराच्या दारुसह मोटारसायकल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तालुक्यापासून काही अंतरावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. गौरनगरच्या काही अंतरावर आंतरजिल्हा नाकाबंदी चेकपोस्ट उभारुन तिथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव पोलिसांची कारवाई : आरोपी फरार,गडचिरोली जात होती दारु

लोकमत न्यूज नेटवर्क

अर्जुनी मोरगाव : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोटारसायकलने दारुची तस्करी करीत असलेल्या इसमाला अर्जुनी मोरगाव पोलिसांनी पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र दारुचा साठा आणि मोटारसायकल सोडून आरोपी फरार झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास गौरनगर येथे करण्यात आली.सध्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने दारुची वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट तयार करण्यात आले आहे. तालुक्यापासून काही अंतरावर गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागून आहे. गौरनगरच्या काही अंतरावर आंतरजिल्हा नाकाबंदी चेकपोस्ट उभारुन तिथे ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी ३.२० वाजता पोलीस निरीक्षक महादेव तोंदले आपल्या ताफ्यासह सदर मार्गावर गस्त घालून नाकाबंदी चेक पोस्टची पाहणी करीत होते.दरम्यान आसोलीकडून गडचिरोली जिल्ह्यात मार्गक्रमण करण्यासाठी एक इसम स्कुटीवर पोत्याची गाठोडी घेऊन येत असताना पोलिसांना दिसला. सदर ठिकाणी पोलीस दिसताच त्यांनी आल्या त्या मार्गने परत जाण्यासाठी मोटारसायकल वळविल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. ठाणेदार तोंदले यांनी पोलीस हवालदार निकोडे, पोलीस शिपाई निरगुडे यांना त्यांचा पाठलाग करण्यास सांगितले. पाठलाग करतांना पोलीस दिसताच देशी दारुची वाहतूक करणाºया त्या इसमाने दारुच्या पोत्यासह मोटारसायकल रस्त्यावरच ठेऊन दुसºया मार्गाने पळ काढून पोबारा केला.स्कुटी व दारुचे पव्वे ठेवलेले पोते नाकाबंदी चेक पोस्टवर आणून तपासणी केली. दोन बोरीमध्ये ७०० नग देशी दारुचे ९० एमएल, किमत २१ हजार रुपये तसेच होंडा अ‍ॅक्टीव्हा एमएच ३३ एक्स ८१३८ अंदाजे ३० हजार किमतीची दारु जप्त करुन कारवाई केली.ठाणेदार महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली चेक पोस्ट येथे कर्तव्यावर असलेले शिवदास निकोडे, सोडगीर, निरगुडे, वाघाळे, एसएसटी पथकाचे पोलीस शिपाई रेगिवाले, ग्रामसेवक ,जनबंधू, छायाचित्रकार साखरे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी