शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आता मोबाईल ॲप लावणार वाहन अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघात टाळण्यासाठी शोधून काढलेले हे ॲप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून यामध्ये काम करण्यात आले आहे. ॲडमिनची एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले याची नोंद घेण्यात आली किंवा नाही हे स्वतः पाहत असतो.

ठळक मुद्दे६४ पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण : १६ पोलीस ठाण्यांतील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने वर्षाकाठी लाखो लोक  मृत्यूमुखी पडतात. हे मृत्यू टाळण्यासाठी तसेच घडलेल्या अपघाताचे कारण, घटनास्थळावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना करून अपघातांना ब्रेक लावण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला. गोंदिया जिल्ह्यातही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने अपघात टाळण्यासाठी शोधून काढलेले हे ॲप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून यामध्ये काम करण्यात आले आहे. ॲडमिनची एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले याची नोंद घेण्यात आली किंवा नाही हे स्वतः पाहत असतो. या नवीन ॲपच्या मदतीने अपघात रोखण्यास निश्चितच मदत होणार आहे.आतापर्यंत दहा लाइव्ह केसेस इंट्री करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.

आतापर्यंत ९५ अपघातांची नोंद-  गोंदिया जिल्ह्यात सन २०२१ च्या सहा महिन्यांत ९५ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७२ लोक जखमी असल्याचे पुढे आले आहे. कोरोनामुळे संचारबंदी असली तरी देखील अपघाताची संख्या सहा महिन्यांत शेकडोंच्या घरात गेली आहे. गोंदिया जिल्ह्यात सन २०१९ मध्ये २६५ अपघात घडले होते. यात १६० जणांचा मृत्यू झाला, तर ३२४ जण जखमी झाले होते. सन २०२० मध्ये २१८ अपघात झाले होते. यात १४० जणांचा मृत्यू झाला आहे. यात २३७ लोक जखमी झाले आहेत.असा करणार अभ्यास-  मोबाइल ॲपवर एखाद्या अपघाताची नोंद झालेली नसेल तर त्याची नोंद फिल्ड ऑफिसर घेईल. अपघाताचे कारण काय आहे, त्यावर अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रात्री अपघात झाला तर त्या घटनास्थळावर लाइट होती किंवा नव्हती याचा अभ्यास केला जाणार आहे.-  वाहनांना समोरचे वाहन दिसले किंवा नाही. लाइट लावण्याची गरज आहे का, पुलावर अपघात घडला असेल तर त्या पुलावर कठडे होते किंवा नाही. कठडे लावण्याची गरज आहे का, तसेच घटनास्थळाचे लाइव्ह लोकेशन त्या घटनास्थळाचा अक्षांश आणि रेखांश या ॲपमधून दिसणार आहे. एकंदरीत अपघातावर आळा घालण्यासाठी हे ॲप मदत करणार आहे.६४ जणांना प्रशिक्षण- गोंदिया जिल्ह्यात १६ पोलीस ठाणी आहेत. आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, केशोरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, रावणवाडी, रामनगर, गोंदिया शहर व गोंदिया ग्रमीण अशा १६ पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक अधिकारी व तीन कर्मचारी अशा ६४ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :MobileमोबाइलAccidentअपघात