सामाजिक उत्थानासाठी शिक्षकाने तयार केली अशीही गुणपत्रिका

By Admin | Updated: July 7, 2014 23:40 IST2014-07-07T23:40:08+5:302014-07-07T23:40:08+5:30

शिक्षक समाजप्रबोधनाचा शिल्पकार आहे. मात्र आजघडीला समाज प्रबोधन करणारे, समाज उत्थानासाठी झटणारे शिक्षक शोधून सापडत नाही. तर कुठे समाजासाठी झटणारी व जगणारी शिक्षकी पेशातील

Marks that teachers have prepared for social upliftment | सामाजिक उत्थानासाठी शिक्षकाने तयार केली अशीही गुणपत्रिका

सामाजिक उत्थानासाठी शिक्षकाने तयार केली अशीही गुणपत्रिका

बेची बचावचा संदेश : जिल्ह्यातील पहिला प्रयोग
गोरेगाव : शिक्षक समाजप्रबोधनाचा शिल्पकार आहे. मात्र आजघडीला समाज प्रबोधन करणारे, समाज उत्थानासाठी झटणारे शिक्षक शोधून सापडत नाही. तर कुठे समाजासाठी झटणारी व जगणारी शिक्षकी पेशातील मानसे क्वचित प्रकाश झोतात येतात. अशाच एका शिक्षकाची समाज जागृतीची धडपड निश्चित वाचकांना प्रेरणादायी ठरणारी आहे.
येथील शहीद जान्या-तिम्या जि.प. हायस्कूल गोरेगाव येथे कार्यरत शिक्षक एम.पी.शेख यांच्या कल्पनेतून तयार झालेल्या या गुणपत्रिकेतून सामाजिक प्रश्न हाताळण्याचा हा प्रकार आहे. शासनाच्या ‘एकच ध्यास- करू अभ्यास’ या उपक्रमाला पुढे ठेवून सामाजिक उत्थानासाठी समाजातील ज्वलंत विषयांना जागृती देण्यासाठी गुणपत्रिकेच्या चारही कडेला ‘बेटी बचाव’ ‘एकच ध्यास करू अभ्यास’ श्रेणी वर्णन स्त्री भ्रुणहत्या थांबवा-सन्मानाने जगा, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, लेक वाचवा, जग वाचवा, लेक वाचवा-सुराष्ट्र निर्माण करा इत्यादी माहिती लिहिण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा पहिला उपक्रम आहे, हे विशेष.या गुणपत्रिका तयार करण्यासाठी शिक्षक एम.पी. शेख यांनी शिक्षकांचे सहकार्य घेतले. या गुणपत्रिकेच्या खालच्या बाजूला सौजन्य व पुढे नाव आहे. विशेष म्हणजे ५ ते ८, ९ व ११ या वर्गाच्या वेगवेगळ्या संदेशाने माहिती देणाऱ्या गुणपत्रिका शिक्षक शेख यांनी तयार केल्या आहेत. या गुणपत्रिका तयार करण्यासाठी वंदना नेवारे, विठा वासनिक यांनी आर्थिक मदत केली. तर वाय.एम. रामटेके, डी.के. रहांगडाले, आर.सी. बिरणवार, सुनील हरिणखेडे, ए.ए. बॅनर्जी, गजबे, जुगनाहके, वाय.पी. देवकते, गटशिक्षणाधिकारी तथा प्रभारी प्राचार्य आर.एल. मांढरे, पी.एस. रहांगडाले, कऱ्हाडे, मेश्राम, गजभिये सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Marks that teachers have prepared for social upliftment